पुणे पिंपरी करांना दिलासा! १२ ऑक्टोबरपासून सुरू होणार पुणे-लोणावळा लोकल सेवा
अनेक दिवसांपासून सर्वसामान्य नागरिकांची लोकल सेवा सुरू करण्याची मागणी केली जात होती. दरम्यान मागील सहा महिन्यांहून अधिक काळ बंद असलेली लोणावळा लोकल सोमवारपासून धावणार आहे...

पुणे पिंपरी करांना दिलासा! १२ ऑक्टोबरपासून सुरू होणार पुणे-लोणावळा लोकल सेवा
पुणे पिंपरी (Pune Pimpri) : अनेक दिवसांपासून सर्वसामान्य नागरिकांची लोकल सेवा सुरू करण्याची मागणी केली जात होती. दरम्यान मागील सहा महिन्यांहून अधिक काळ बंद असलेली लोणावळा लोकल सोमवारपासून धावणार आहे. पुणे रेल्वे स्थानकातून सकाळी ८ वाजून ५ मिनिटांनी पहिली लोकल सुटेल. तर सायंकाळी ६ वाजून ५ मिनिटांनी दुसरी लोकल धावेल. लोणवळा येथून सकाळी व सायंकाळी प्रत्येकी एकच लोकल सोडण्यात येणार आहे. मात्र, लोकलमध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली.
राज्य शासनाकडून पुणे – लोणावळा लोकल सुरू करण्यासाठी पोलिस आयुक्तांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून यासंदर्भात त्यांची रेल्वे अधिकाऱ्यांसोबत मागील आठवड्यापासून चर्चा सुरू होती. अखेर सोमवारी झालेल्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. पुणे व लोणावळा येथून दररोज सकाळी व सायंकाळी याप्रमाणे प्रत्येक दोन गाड्या सोडण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.
पुणे शहर व पुणे महानगर पालिका हददीतील विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पीएमपीएमएल, राज्य परिवहन विभाग, महावितरण यांसह सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये तसेच सर्व शासकीय व खाजगी सहकारी बँक, सर्व शासकीय व खाजगी रुग्णालये, रक्त तपासणी व प्रयोगशाळा, फार्मा कंपनी, आंतरराष्ट्रीय संस्था आदी अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी या लोकलने प्रवास करू शकतील.
अशा असणार लोकलच्या वेळा
पुण्यातून – सकाळी ८.०५
सायंकाळी ६.०५
लोणावळ्याहुन – सकाळी ८.२०
सायंकाळी – ५.०५
पिंपरी , पुणे
प्रतिनिधी - आत्माराम काळे
____________
Also see : राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे कोरोनामुक्त
https://www.theganimikava.com/State-Urban-Development-Minister-Eknath-Shinde-released