शहापूर मध्ये काँग्रेसच्या शेतकरी बचाव डिजिटल रॅलीचे आयोजन

 महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय शेतकरी बचाव डिजिटल रॅलीचे शहापूर तालुका काँग्रेस कमिटी तर्फे शेटे मॅरेज हॉल शहापूर येथे आयोजन करण्यात आले होते.

शहापूर मध्ये काँग्रेसच्या शेतकरी बचाव डिजिटल रॅलीचे आयोजन
Congress organizes farmer rescue digital rally in Shahapur

शहापूर मध्ये काँग्रेसच्या शेतकरी बचाव डिजिटल रॅलीचे आयोजन

 महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय शेतकरी बचाव डिजिटल रॅलीचे शहापूर तालुका काँग्रेस कमिटी तर्फे शेटे मॅरेज हॉल शहापूर येथे आयोजन करण्यात आले होते.

काल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी तर्फे 6 ठिकाणी या रॅलीचे आयोजन करून त्याचे राज्यभर सायंकाळी 4 वाजता थेट प्रक्षेपण करण्यात आले या डिजिटल रॅलीच्या थेट प्रक्षेपण दाखविण्याचा कार्यक्रम शहापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष माजी उपसभापती महेश धानके यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आला,या कार्यक्रमास प्रदेश उपाध्यक्ष सुभाष कानडे,ओबीसी विभागाचे प्रदेश अध्यक्ष प्रमोद मोरे,जिल्हा उपाध्यक्ष तथा कार्यक्रम निरीक्षक विजय पाटील यांनी भेट दिली. तालुका अध्यक्ष महेश धानके यांनी या डिजिटल रॅलीचे महत्व,कृषी विधेयकाचे तोटे,स्वाक्षरी अभियान,आणि काँग्रेसची भूमिका याबाबत माहिती दिली.

कार्यक्रमास जेष्ठ नेते पद्माकर केव्हारी,अपर्णाताई खाडे, महिला अध्यक्षा संध्याताई पाटेकर,युवक अध्यक्ष अंकुश भोईर,जितेश विशे,पद्माकर वरकुटे,महेंद्र आरज,मल्हारी कोळेकर, जयंत पाटील,बाळा हुकमाली, लक्ष्मण निचिते,नौशाद शेख,शांताराम धामणे,शंकर सासे, जयवंत पाटेकर, सुरेश पानसरे,आदी मान्यवर उपस्थित होते.

सदर प्रसंगी स्वाक्षरी महिमेत 350 सह्या घेणारे महेंद्र आरज,शांताराम धामणे यांचा व वाढदिवसाच्या निमित्ताने जितेश विशे यांचा विजयदादा पाटील यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.

शहापूर 
प्रतिनिधी - योगेश हजारे 

_________

Also see : दुर्मिळ नवरंग पक्षी उष्माघातामुळे जखमी

https://www.theganimikava.com/Rare-Navrang-bird-injured-by-heatstroke