जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून वाडा येथे रक्तदाब शिबिर संपन्न
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून रविवार दि.२७ सप्टेंबर २०२० कोरोना महामारीच्या पाश्वभूमीवर रक्तदान शिबिर आयोजन केले होते....

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून वाडा येथे रक्तदाब शिबिर संपन्न
वाडा : जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून रविवार दि.२७ सप्टेंबर २०२० कोरोना महामारीच्या पाश्वभूमीवर रक्तदान शिबिर आयोजन केले होते. ह्या वेळी प्रमुख पाहुणे जिजाऊ महिला सक्षमीकरण प्रमुख मोनिका मोहन पानवे उपस्थित होत्या.
वाडा परिसरातील ८४ रक्त दात्यांनी रक्तदानाचे महान कार्य बजावले. जव्हार येथील जव्हार ब्लड बँक व डाॅ.रामेश्वर गरुड यांच्या टिमने रक्तसंकलनाचे काम केले.
कार्यक्रम उद्घाटन स्थळी प्रमुख पाहुणे म्हणून पालघर जिल्हा परिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते नरेश आकरे , वाडा पंचायत समितीचे उपसभापती जगदीश पाटील साहेब,जिल्हा परिषद सदस्य शशिकांत पाटील, ज्ञानेश्वर सांबरे,संदेशजी ढोणे, विक्रमगड नगरपंचायतीचे मा.उपनगराध्यक्ष निलेश (पिंका) पडवले , विक्रमगड पंचायत समिती सदस्य विनोद भोईर ,जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे उपअध्यक्ष प्रमोद पाटील,कोकण विकास कामगार संघटनेचे सरचिटणीस महेंद्र ठाकरे , माले ग्रामपंचायत माजी उपसरपंच राजु देसले आदी मान्यवर उपस्थित होते.
वाडा
प्रतिनिधी - जयेश घोडविंदे
________
Also see : माध्यमिक व उच्च माध्यमिक शा. शिक्षक महामंडळाची कोअर कमिटी तसेच पुरस्कार कमिटीची सभा संपन्न