नृत्याचा अंकांशी  जवळचा संबंध:सुचेता भिडे-चापेकर

नृत्यमय गणित वेबिनार' उपक्रमाला चांगला प्रतिसाद...

नृत्याचा अंकांशी  जवळचा संबंध:सुचेता भिडे-चापेकर
Close relationship of dance with numbers: Sucheta Bhide-Chapekar

नृत्याचा अंकांशी  जवळचा संबंध:सुचेता भिडे-चापेकर

नृत्यमय गणित वेबिनार' उपक्रमाला चांगला प्रतिसाद

 

पुणे :'शरीराद्वारे तालाच्या बिंदुनी मिळून तयार झालेले रेखाचित्र म्हणजे नृत्य असून नृत्याचा अंकांशी  जवळचा संबंध आहे,नृत्य हा खेळ असून तो गणिताच्या सहाय्याने खेळावा लागतो',असे प्रतिपादन ज्येष्ठ नृत्य गुरु सुचेता भिडे-चापेकर यांनी केले.   मॅप एपिक कम्युनिकेशन प्रा.लि.च्या 'अंकनाद' या गणितविषयक गोडी निर्माण करणाऱ्या ऍप द्वारे 'नृत्यमय गणित' या  विषयावरील वेबिनारचे आयोजन शनिवारी अकरा वाजता  करण्यात आले होते.नृत्यगुरु सुचेता भिडे-चापेकर यांनी मार्गदर्शन केले.नृत्यांगना सई लेले-परांजपे ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता या वेबिनारमध्ये मार्गदर्शन करणार आहेत.शैक्षणिक सल्लागार प्राची साठे यांनी चर्चेचे संचालन केले.  नृत्यगुरू सुचेता भिडे-चापेकर म्हणाल्या,'गणिताशी व नृत्याची एकमेंकांशी गट्टी आहे.टाळ्यांचा तालावर नृत्य म्हणजे अंकांची ओळख होय.विभाज्यतेच्या कसोट्या वर आधारित स्वरबद्धता केली जाते.भागाकार येणं हे विद्यार्थ्याना बऱ्याचदा अवघड जाते. पण नृत्यातून हे सहज शक्य होते.अंकनाद मधून पाढे ही पाठ होतात.तालाची जाण समजून घेण्यासाठी गणिताची पावलोपावली मदत होते.

'नृत्यात आकृतिबंध, सममिती, संख्यारेषा, संख्यांचे प्रकार जसे मूळ, संयुक्त, सम, विषम संख्या दिसून येते. नृत्य सादर करताना विविध प्रकार, आयाम  दाखविले जातात त्यासाठी भूमितीची जाण असणे आवश्यक असते. त्यामध्ये बिंदू ,अनेक बिंदूना जोडून रेषा तयार होते.आडवी रेषा, उभी रेषा, तिरकी रेषा असे भौमितिक आकार असतात . योग्य कोनातून, आयत, चौरसाकृतीतून आकार दिसून येतात. द्विमिती,त्रिमिती दिसून येते,'असेही सुचेता भिडे -चापेकर यांनी सांगितले. 
    पालकांनी देखील पाल्याना गणितात रस घेण्यासाठी प्रोत्साहन द्यावे,गणित हा रुक्ष विषय न राहता तो आनंदाचा विषय व्हावा,असे प्राची  साठे यांनी सांगितले पराग गाडगीळ,मंदार नामजोशी,निर्मिती  नामजोशी,समीर बापट यांच्यासह 'गणितालय' चे सदस्य विद्यार्थी या वेबिनार मध्ये सहभागी झाले
वैशाली चंद्रवदन,मुग्धा असनीकर यांनी नृत्य प्रात्यक्षिकात सहभाग घेतला.                         

पुणे

प्रतिनिधी - अशोक तिडके

_____________

Also see : मनोर येथे रोटरी क्लब ऑफ पालघरतर्फे डायलिसिस सेंटर सुरू

https://www.theganimikava.com/Dialysis-center-started-by-Rotary-Club-of-Palghar-at-Manor