कल्याणात रेल्वे स्थानकाबाहेर मनसेचे सविनय कायदेभंग आंदोलन

मुंबई लोकल लवकर सुरु करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सविनय कायदेभंग आंदोलनाची हाक दिली होती....

कल्याणात रेल्वे स्थानकाबाहेर लोकल सुरू करण्याच्या मागणीसाठी मनसेचे सविनय कायदेभंग आंदोलन

मुंबई लोकल (mumbai local) लवकर सुरु करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सविनय कायदेभंग आंदोलनाची हाक दिली होती .या पार्श्वभूमीवर कल्याण रेल्वे स्थानकात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आज मनसेच्या कल्याण शहर शाखेच्या वतीने कल्याण रेल्वे स्थानकात मनसे पदाधिकरी कार्यकर्त्यांनी रेल्वे स्थानकात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी  मध्यस्ती करत या मनसैनिकांना रेल्वे स्टेशन प्रवेशद्वारावरच रोखले. त्यानंतर मनसे कडून कल्याण रेल्वे स्थानकांबाहेर सरकार (governent) विरोधात घोषणाबाजी  करण्यात आली. तसेच सरकारने (gov) लवकरात लवकर लोकल सुरू करत जनतेला दिलासा द्यावा अन्यथा, आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला.

 ह्या आंदोलनामध्ये माजी आमदार प्रकाश भोईर, जिल्हा अध्यक्ष उल्हास भोईर, शहर अध्यक्ष कौस्तुभ देसाई, मनविसे शहर अध्यक्ष विनोद केणे, उपशहर अध्यक्ष गणेश चौधरी, रुपेश भोईर आदींसह मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

कल्याण, ठाणे
प्रतिनिधी - कुणाल म्हात्रे

_______

Also see : आटगावजवळ लोकलचा डबा घसरला ,आसनगाव ते कसारा वाहतूक ठप्प

https://www.theganimikava.com/Local-train-derailed-near-Atgaon-traffic-jam-from-Asangaon-to-Kasara