वर्षभरापूर्वी मृत्यू झाल्यानंतरही मृतदेह अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत

डिसेंबर 2020 मध्ये छत्तीसगड राज्याच्या बीजापूर जिल्ह्यात एका आदीवासी युवकाची पोलिसांनी नक्षलवादी समजून हत्या केली होती.

वर्षभरापूर्वी मृत्यू झाल्यानंतरही मृतदेह अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत
Chhattisgrah News

वर्षभरापूर्वी मृत्यू झाल्यानंतरही मृतदेह अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत

Even after dying a year ago, the bodies are still awaiting cremation

डिसेंबर 2020 मध्ये छत्तीसगड राज्याच्या बीजापूर जिल्ह्यात एका आदीवासी युवकाची पोलिसांनी नक्षलवादी समजून हत्या केली होती.

छत्तीसगड  राज्यात सैनिकांवर नक्षलवादी हल्ला  होणं हे काही नवीन नाही. त्यामुळे नक्षली कारवायांना चाप घालण्यासाठी सैनिक अनेकदा या जंगली भागात मोठ्या कारवाया करत असतात. नक्षलवाद्यांवर कारवाई करत असताना कित्येकदा यामध्ये निष्पाप लोकांचाही जीव जातो.

अशीच एक घटना डिसेंबर 2020 मध्ये घडली आहे. बिजापूर जिल्ह्याच्या गामपूर येथील रहिवासी असणाऱ्या बदरू नावाचा 22 वर्षीय युवक जंगलात महुआची फुलं वेचण्यासाठी गेला होता.

यावेळी खाकी वर्दीतील जवानांनी त्याच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात बदरू नावाच्या युवकाचा जागीचं मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच गावात खळबळ उडाली. त्यामुळे गावातील काही लोकं घटनास्थळी धावत गेले.

खाकी वर्दीतील काही लोकं संबंधित युवकाचा मृतदेह पायाला धरून ओढत घेऊन चालले होते. पोलिसांनी या मृतदेहाचं शवविच्छेदन केलं, परंतु मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला नाही. त्यामुळे गावकऱ्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन आंदोलन करावं लागलं, त्यानंतर पोलिसांनी नातेवाईकांकडे मृतदेह सुपूर्द केला.

मृत बदरू हा नक्षली टोळीशी संबंधित असून तो जन मिलिशिया चा कमांडर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. यावेळी बदरूकडे बॉम्ब आणि अत्याधुनिक हत्यार मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली. पण ग्रामस्थांच्या मते, बदरू हा निष्पाप असून तो जंगलात महुआची फुलं वेचण्यासाठी गेला होता. यावेळी पोलिसांनी त्याच्यावर हल्ला करून त्याला जीवे मारलं.

त्यामुळे गावकऱ्यांनी त्याच्या मृतदेहावर अजूनही अंत्यसंस्कार केले नाहीत. त्यांनी बदरूच्या मृतदेहावर कोणतं तरी औषध लावलं असून त्याचा मृतदेह जमीनीच्या आत ठेवला आहे. जोपर्यंत त्यांना न्याय मिळणार नाही, तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही असा पवित्रा गावकऱ्यांनी घेतला आहे. बदरूच्या मृतदेहाची अवस्था अत्यंत वाईट झाली, असून फक्त हाडं उरली आहेत.

अशा स्थितीतही गामपूर गावातील रहिवासी न्यायासाठी लढत आहेत. बदरूचं पुर्ण नाव बदरू माडवी असून तो गामपूर गावातील माडवी पाड्यात राहत होता.