मुंबईकर शिवसेनेला महापालिका निवडणुकीत जागा दाखवून देतील

चंद्रकांत पाटील यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने एका छोटेखानी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

मुंबईकर शिवसेनेला महापालिका निवडणुकीत जागा दाखवून देतील
Chandrakant Patil news

मुंबईकर शिवसेनेला महापालिका निवडणुकीत जागा दाखवून देतील

चंद्रकांत पाटील यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने एका छोटेखानी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. 

जारो कोटींचा खर्च करूनही मुंबईतील नालेसफाईचा प्रश्न सुटत नाही. मी सुद्धा काल मुंबईत अडकलो होतो. मुंबई तुंबई होतेय हे खरं आहे, असं सांगतानाच येत्या पालिका निवडणुकीत मुंबईकर शिवसेनेला जागा दाखवून देतील, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला. (Mumbaikars will show Shiv Sena a seat in the municipal elections)

चंद्रकांत पाटील यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने एका छोटेखानी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी मीडियाशी बोलताना त्यांनी हा इशारा दिला. माझ्या वाढदिवसानिमित्ताने मी नेहमी काही तरी वेगळं करत असतो. रिक्षाचालकांना कुपन, रेशन किट वाटप केले. तीन हजार लोकांना हे वाटप केलं.

वंचित घटकांसाठी मोफत लसीकरण सुरू केलं आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी त्यात भाग घेतला आहे, असं पाटील म्हणाले.राज्यातील कोरोना बळींची संख्या लपवली जात आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मृत्यूची संख्या जाहीर झालेली असताना त्यात एक लाख मृत्यूंचा फरक आहे. देशात राज्याचा वन थर्ड फरक आहे, असंही ते म्हणाले.


राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपची बैठक झाली. त्यात स्थानिक पातळीवरील निवडणुकीत मोदींचा फोटो न वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यावर बोलण्यास पाटील यांनी टाळले. माझ्यापेक्षा तुम्हाला अधिक माहिती आहे. त्याबद्दल आनंद वाटला. मला याबाबत काहीच माहीत नाही, असं बोलून पाटील यांनी अधिक भाष्य करणं टाळलं.आरक्षण असो की अन्य काहीही राज्यातील आघाडी सरकारला काही करता येत नाही.(Mumbaikars will show Shiv Sena a seat in the municipal elections)

दहा महिने झाले. मुख्यमंत्री मंत्रालयात जात नाहीत. यापेक्षा वेगळं काही होणार नाही, अशी खोचक टीका त्यांनी केली.