पुढील तीन दिवसात वीजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता

पुढील तीन दिवसात वीजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे...

पुढील तीन दिवसात वीजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता
Chance of torrential rain with thunderstorms in the next three days

पुढील तीन दिवसात वीजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता

ठाणे : पुढील तीन दिवसात वीजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. विशेषत: किनारपट्टी लगतच्या सर्व जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिक आणि यंत्रणांना सावधानतेचा आणि सुरक्षिततेचा इशारा देण्यात आला आहे.

अतिवृष्टी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यानं सखल भागातील नागरिकांनी सतर्क रहावं असं आवाहन करण्यात आलं आहे. मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या कुठल्याही प्रकारच्या आपत्कालीन स्थितीमध्ये मदतीसाठी २५३० १७४० या दूरध्वनीवर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आले आहे.

भिवंडी, ठाणे 
प्रतिनिधी - सत्यवान तरे 

__________

Also see : ‘मंदिर बंद,उघडले बार; उद्धवा, धुंद तुझे सरकार!’

https://www.theganimikava.com/Temple-closed-bar-open-Rise-up-fog-your-government