पंडित दीनदयाल उपाध्याय यांची मुरबाडमध्ये ठीक ठिकाणी जयंती साजरी
भारतीय जनसंघाचे शिल्पकार, मानव व राष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी महासंघटक व महासचिव म्हणून काम करणारे पंडित दीनदयाल उपाध्याय यांची आज जयंती मुरबाड शहरासह संपूर्ण ग्रामीण भागांमध्ये साजरी करण्यात आली...
पंडित दीनदयाल उपाध्याय यांची मुरबाडमध्ये ठीक ठिकाणी जयंती साजरी
भारतीय जनसंघाचे शिल्पकार, मानव व राष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी महासंघटक व महासचिव म्हणून काम करणारे पंडित दीनदयाल उपाध्याय यांची आज जयंती मुरबाड शहरासह संपूर्ण ग्रामीण भागांमध्ये साजरी करण्यात आली. तर मुरबाड शहरात मुरबाड नगर पंचायतीचे माजी नगराध्यक्ष किसन कथोरे यांच्या निवासस्थानी पंडित दीनदयाल उपाध्याय व भारत माता यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तर आमदार कथोरे यांच्या मुरबाड येथील कार्यालयात भाजप पक्षाचे मुरबाड तालुका अध्यक्ष जयवंत सूर्यराव, जिल्हा सरचिटणीस नितीन मोहोपे, मुरबाड शहर अध्यक्ष सुधीर भाई तेलवणे, जिल्हा उपाध्यक्ष दीपक घाटेघरे, खंडू दादा मोरे ,मोहन भाऊ दुधाडे,ज्योतीताई गोडांबे ,जयवंत कराले,नगराध्यक्षा छायाताई चौधरी, उपनगरअध्यक्षा अर्चना विशे, माऊली सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संतोष चौधरी उर्फ माऊली इत्यादी भाजप पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. तर मालगटांमध्ये तळेगाव गणाचे केंद्रप्रमुख रघुनाथ खाकर यांनी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या कार्याची महती आदिवासी बांधवांना पटवून दिली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मुरबाड पंचायत समितीच्या उपसभापती अरुणाताई खाकर, जिल्हा परिषद सदस्य गोविंद भला , जिल्हा उपाध्यक्ष विलास देशमुख, सरपंच कमल पारधी इत्यादी भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
मुरबाड
प्रतिनिधी - लक्ष्मण पवार
____________
Also see : केडीएमसी लवकरच उभारणार पोस्ट कोविड रिहॅबिलीटेशन सेंटर