आरपीआय व फेडरेशनच्या वतीने मुरबाडमध्ये कॅन्डल मार्च

उत्तरप्रदेश मधील हाथरस येथील मनीषा वाल्मिकी वर झालेल्या अत्याचार (हत्या) निषेधार्थ आज मुरबाडमध्ये कँडल मार्च काढण्यात आला....

आरपीआय व फेडरेशनच्या वतीने मुरबाडमध्ये कॅन्डल मार्च
Candle march in Murbad on behalf of RPI and Federation

आरपीआय व फेडरेशनच्या वतीने मुरबाडमध्ये कॅन्डल मार्च 
 

हाथरस येथिल मनीषा वाल्मिकी यांस वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली 

मुरबाड, दिनांक ०७ : उत्तरप्रदेश मधील हाथरस (चांदपा) येथील असहाय्य मनीषा वाल्मिकी हिच्या वर झालेल्या अत्याचार (हत्या) निषेधार्थ आज  मुरबाडमध्ये कँडल मार्च काढण्यात आला असून या कँडल मार्च मध्ये रिपाइं मुरबाड तालुका अध्यक्ष दिनेश उघडे, रिपाई ठाणे जिल्हा सचिव भगवान पवार, शहराध्यक्ष कैलास देसले, आदिवासी नेते राजाभाऊ सरनोबत, संजयजी धनगर, गौतम रातांबे, कास्ट्राईब संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय धनगर, लोकक्रांतीचे संस्थापक अध्यक्ष व पर्यावरण जिल्हाध्यक्ष नरेश मोरे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष शंकरजी करडे, शिवराम उबाळे, रमेश देसले, वैशाली उघडे (माजी जि.प.सदस्या), बळीराम माळवे, चितानंद थोरात, सूरेश चन्ने, मिलिंद भवार, अधिक भवार, विशाल गोईल, भगवान उबाळे, मुकेश उबाळे, राहुल देसले, जयेश पवार, भिमराव उघडे, अजय भवार, आंनद भवार, अविनाश भवार, सुलभा खंडागळे, मोठ्या संख्येने रिपाई कार्यकर्ते, तसेच मुरबाड आंबेडकरनगर व खांदारे, कुडली, गणेश नगर, सोनारपाडा मधिल मोठ्या प्रमाणात मुली व  महिला, तरुण वर्ग व समाज बांधव, पत्रकार बंधु उपस्थित होते.

मुरबाड

 प्रतिनिधी - लक्ष्मण पवार 

______