कॅनरा बँकेचा ग्राहकांना ॲलर्ट

सायबर क्राईम, ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी कॅनरा बँक नेहमी ग्राहकांना जागृत करत असते.

कॅनरा बँकेचा ग्राहकांना ॲलर्ट
Canara Bank news

कॅनरा बँकेचा ग्राहकांना ॲलर्ट

Canara Bank alerts customers

सायबर क्राईम, ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी कॅनरा बँक नेहमी ग्राहकांना जागृत करत असते.

कॅनरा बँकेने त्यांच्या ग्राहकांसाठी महत्वाची सूचना दिली आहे. अलीकडच्या काळातील वाढते सायबर क्राईम, ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी कॅनरा बँक नेहमी ग्राहकांना जागृत करत असते. कॅनरा बँकेने त्यांच्या ग्राहकांना एटीएम कार्डशी संबंधित एक सेवा बंद करण्यास सांगितलं आहे. 


कॅनरा बँकेने त्यांच्या ग्राहकांना एटीएमवरील आंतरराष्ट्रीय व्यवहार ही सेवा बंद करण्यास सांगतिलं आहे. बँकेने ग्राहकांना ‘ प्रिय ग्राहक, कोणत्याही अनावश्यक बँक व्यवहारांपासून वाचण्यासाठी तुमच्या खात्यावरील मोबाईल बँकिंग, नेट बँकिंग, एटीएम आणि बँकेतून करण्यात येणारे आंतरराष्ट्रीय व्यापार बंद करा, असं म्हटलं आहे.’ ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार किंवा सायबर गुन्हे मोठ्या प्रमाणावर परदेशातून होत असतात त्यामुळे कॅनरा बँकेने ग्राहकांना हे आवाहन केलं आहे. आंतरराष्ट्रीय व्यवहार बंद केल्यास फसवणुकीचे प्रकार कमी होतील, असं बँकेचं मत आहे.


कॅनरा बँकेने ग्राहकांना ज्यावेळी आंतरराष्ट्रीय व्यवहार करायचे असतील त्यावेळी ते करु शकतात, असं म्हटलं आहे. ही सेवा आवश्यक असेल त्यावेळी पुन्हा सुरु करता येईल, यासाठी अधिक वेळ लागत नाही, असं देखील कॅनरा बँकेने कळवलं आहे.केंद्र सरकारच्या निर्णयानुसार सिंडीकेट बँक कॅनरा बँकेत विलीन करण्यात आली आहे. त्यामुळे सिंडीकेट बँकेचे आयएफएससी कोड 1 जुलैपासून बंद होणार आहेत. ग्राहकांनी नवे उपलब्ध करुन घेण्याचं आवाहन बँकेने केलं आहे.

तुम्ही जर भारतीय स्टेट बँकेचे  चे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण, देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सगळ्यात मोठी बँक फक्त देशातच नाही तर आंतरराष्ट्रीय व्यवहार देखील करते. गेल्या काही दिवसांआधीच बँकेने एक महत्त्वाची घोषणा केली होती. आंतरराष्ट्रीय व्यवहारात अडचण येत असेल तर ताबडतोब तुमच्या पॅनकार्डसंबंधित माहिती बँकेला द्या अशी अधिसूचना देशाबाहेरील ग्राहकांसाठी बँकेने जारी केली होती.

बँकबाजार डॉट कॉमने दिलेल्या माहितीनुसार, कोणताही एसबीआय ग्राहक पॅनकार्ड एसबीआय खात्यासह ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही ठिकाणी जोडू शकतात. यासाठी www.onlinesbi.com या अधिकृत वेबसाईटवर जाऊन My Accounts ऑप्शन निवडा आणि Profile-Pan Registration वर क्लिक करा.

यानंतर एक नवं पान उघडलं जाईल. यामध्ये जर तुमचं पॅन खातं आधीपासूनच बँक खात्याशी लिंक असेल तर तसं तुमच्या स्क्रिनवर दिसेल. जर खातं पॅनशी जोडलेलं नसेल तर तुम्हाला खाते क्रमांक विचारला जाईल. यावर, खाते क्रमांक निवडा आणि तिथे दर्शविलेल्या पर्यायामध्ये पॅन नंबर भरा. यानंतर सबमिट करा.

या प्रक्रियेद्वारे तुम्ही तुमच्या खात्यात पॅन नंबर जोडू शकता.