शेतकऱ्यांनी पेरणीसाठी किडन्या काढल्या विकायला

बँकाकडून होणाऱ्या छळाला कंटाळून बुलडाण्यातील शेतकऱ्यांनी आता नाईलाजाने त्यांची किडनी 50 हजाराला विकायला काढली आहे.

शेतकऱ्यांनी पेरणीसाठी किडन्या काढल्या विकायला
Budhana Farmers Selling Kidney

शेतकऱ्यांनी पेरणीसाठी किडन्या काढल्या विकायला

बँकाकडून होणाऱ्या छळाला कंटाळून बुलडाण्यातील शेतकऱ्यांनी आता नाईलाजाने त्यांची किडनी 50 हजाराला विकायला काढली आहे. 

बँकाकडून होणाऱ्या छळाला कंटाळून बुलडाण्यातील शेतकऱ्यांनी आता नाईलाजाने त्यांची किडनी 50 हजाराला विकायला काढली आहे. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे परवानगी मागितली आहे. पेरणीसाठी पैसे हवे म्हणून शेतकऱ्यांनी किडनी विकायला काढली आहे. यावरुनच हे दिसून येते की बळीराजा किती हतबल झाला आहे (Budhana Farmers Selling Their Kidney)

पीक कर्जासाठी बँकांकडून छळ होत असल्याची तक्रार करत मलकापूर तालुक्यातील लोणवडी येथील शेतकऱ्यांनी पेरणीसाठी किडनी विकण्याची परवानगी मुख्यमंत्र्यांकडे मागितलीय. उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत त्‍यांनी हे निवेदन काल पाठवलेय. त्यामुळे खळबळ उडालीये.

सध्या पेरणीचे दिवस आहे. शेतकऱ्यांना बँकांकडून कर्ज घेतल्याशिवाय पेरणी करता येत नाही. कारण कोरोना काळात लावलेल्या लॉकडाऊन यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच, यापूर्वी झालेली अतिवृष्टी, नापिकी यामुळे शेतकरी अडचणीत आहेत.

लोणवडी येथील दीपक पाटील, योगेश काजळे, दीपकसिंह गौर, सतीश काजळे, नितीन पाटील यांच्‍यासह अन्य शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिलेय की सेंट्रल बँक ऑफ इंडिया, जिल्हा सहकारी बँक आणि लोणवाडी ग्रामसेवा सहकारी संस्‍थेकडून गेल्या वर्षी पीककर्ज घेतले होते. मात्र, अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे ते भरता आले नाही. आता पेरणीचे दिवस जवळ आल्याने पीक कर्जाची आवश्यकता असताना बँका कर्ज देण्यास टाळाटाळ करत आहेत.(Budhana Farmers Selling Their Kidney)

विशेष म्हणजे कोणत्‍याही गरजवंताला अवघ्या 50 हजार रुपयांत प्रतिकिडनी या दराने किडनी देण्यास तयार असल्याचे शेतकऱ्यांनी म्‍हटलेय.