भावूक पोस्ट शेअर करत म्हणाले ‘ती माझ्याकडे चंद्र-तारे देखील मागू शकली असती पण…’

बॉलिवूड अभिनेते बोमन ईराणी यांच्या आईचे बुधवारी सकाळी निधन झाले.

भावूक पोस्ट शेअर करत म्हणाले ‘ती माझ्याकडे चंद्र-तारे देखील मागू शकली असती पण…’
Boman Irani Mother passed away

भावूक पोस्ट शेअर करत म्हणाले ‘ती माझ्याकडे चंद्र-तारे देखील मागू शकली असती पण

बॉलिवूड अभिनेते बोमन ईराणी  यांच्या आईचे बुधवारी सकाळी निधन झाले.

बॉलिवूड अभिनेते बोमन ईराणी  यांच्या आईचे बुधवारी  सकाळी निधन झाले. बोमन ईराणी यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करुन आपल्या आईच्या निधनाची माहिती दिली आहे. त्यांनी आईचा फोटो शेअर केला आहे आणि पोस्ट लिहित तिला श्रद्धांजली वाहिली आहे.मदर ईराणी झोपेतच या जगाला निरोप देऊन गेली. त्यांचे वय 94 वर्षांचे होते. 32 वर्षांची असल्यापासूनच तिने माझ्यासाठी आई व वडील या दोघांचीही भूमिका पाये पाडली आहे. ती खूप चांगली होती. ती आम्हाला मजेशीर किस्से सांगायची.(Sharing a passionate post, she said, "She could have asked me for the moon and stars)


बोमन पुढे लिहितात, ‘जेव्हा ती मला चित्रपट पाहण्यासाठी पाठवायची, तेव्हा ती कंपाऊंडमधील सर्व मुले माझ्याबरोबर जातील यासाठी ती प्रयत्न करत असत. इतकंच नाही तर, म्हणायची चित्रपट पाहताना पॉपकॉर्न खायला विसरू नका. तिला खाणे आणि गाणे खूप आवडायचे. तसेच शेवटच्या क्षणापर्यंत विकिपिडिया आणि आयएमडीबीवर घडणाऱ्या घटना तपासात असायची.

बोमन म्हणतात, ‘ती नेहमी म्हणायची, लोक कौतुक करतात म्हणून तू अभिनेता नाहीस. तू अभिनेता आहेस म्हणून तू लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणले पाहिजे. लोकांना नेहमी आनंदी ठेव. काल रात्री तिने मलाई कुल्फी आणि आंबा मागितला होता. जर तिला हवे असते तर, ती चंद्र आणि तारे देखील मागू शकली असती. ती नेहमीच एक स्टार होती आणि असेल.


बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी बोमन ईराणी यांच्या पोस्टवर कमेंट करून शोक व्यक्त केला आहे. दीया मिर्झाने हार्ट आणि हात जोडलेले इमोजी पोस्ट केले. ‘देव त्यांच्या आत्म्याला शांती देतील’, अशी प्रतिक्रिया बोमनचे चाहतेही व्यक्त करत आहेत.वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर, बोमन ईराणी अखेर ‘मस्का’ चित्रपटामध्ये पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसले होते. लवकरच ते अमिताभ बच्चन आणि अजय देवगनसमवेत ‘मे डे’ या चित्रपटात दिसणार आहेत.(Sharing a passionate post, she said, "She could have asked me for the moon and stars)

याशिवाय ते कबीर खानच्या ‘83’ या चित्रपटातही दिसणार आहेत. जा चित्रपट कपिल देव यांचा बायोपिक आहे.