कृष्णांग सेवाभावी क्रांती  मार्फत नाणे येथे रक्तदान शिबिर संपन्न

वाडा आरोग्य अधिकारी संजय बुरपल्ले यांची उपस्थित राहून केले रक्तदान

कृष्णांग सेवाभावी क्रांती  मार्फत नाणे येथे रक्तदान शिबिर संपन्न
Blood donation camp held at Nane through Krishnang Sevabhavi Kranti
कृष्णांग सेवाभावी क्रांती  मार्फत नाणे येथे रक्तदान शिबिर संपन्न

कृष्णांग सेवाभावी क्रांती  मार्फत नाणे येथे रक्तदान शिबिर संपन्न

वाडा आरोग्य अधिकारी संजय बुरपल्ले यांची उपस्थित राहून केले रक्तदान

 वाडा तालुक्यातील कोहोज किल्ल्याच्या पायथ्याशी  व वैतरणा नदीच्या कुशीत वसलेल्या  नाणे गावात कृष्णांग सेवाभावी क्रांती,नाणे व सहकारी क्रांतीदूत मार्फत व जिजाऊ धर्मादाय रुग्णालय आंबाडी यांच्या संयुक्त विद्यमाने महालक्ष्मी मंदिरात ‌  रक्तदान शिबिर संपन्न झाला. या शिबिराचे उद्घाटन गावातील सरपंच कांचन सांबरे  व किरण थोरात यांच्या हस्ते रिबीन कापुन करण्यात आले.नाणे गावातील ज्ञानेश्वर घरत यांनी पहिल्यांदा रक्तदान करून सुरुवात केली.

कोरोना महासाथीच्या झसंकटात देशासह राज्यात रक्ताची प्रचंड चणचण भासू लागली आहे. या काळात रुग्णांना वेळेवर रक्त न मिळाल्याने अनेकांना प्राण गमावले. यासाठी सामाजिक भावनेतून क्रांतीसेवक नितीन वासुदेव पाटील यांनी नाण्यासारख्या ग्रामीण भागात आयोजन केले होते. या शिबिरात  ४०  रक्तदात्यांनी रक्तदान केले.

या शिबिराला विशेष म्हणजे वाडा तालुक्यातील आरोग्य अधिकारी डॉ.संजय बुरपल्ले व माजी सभापती संतोष बुकले, माजी उपसभापती वैभव ठाकरे,  गणेश वेखंडे   यांनी भेट देऊन रक्तदान केले.  नाणे येथील एकमेव महिला स्वाती निलेश पाटील हीने दुसरे रक्तदान केले.

नालासोपारा येथील साथीया ट्रस्ट ब्लड बॅंकचे संस्थापक डॉ.विजय महाजन व त्यांच्या पथकाने रक्त संकलन केले. कोव्हिड प्रादुर्भाव लक्षात घेता सामाजिक अंतर व निर्जंतुकीकरण , सॅनिटायझरचा‌ वापर करून नियमाचे पालन करण्यात आले.तसेच कृष्णांग सेवाभावी क्रांती मार्फत रक्तदात्यांसाठी फळे,क्षारयुक्त पेय देण्यात आली . यावेळी गावातील कोंडु पाटील, वासुदेव पाटील, डॉ.राहुल नरेश पाटील, रविंद्र घरत, प्रतिक पाटील व महालक्ष्मी  देवस्थान कमिटी उपस्थित होते.

सफाळे पालघर

प्रतिनिधी -रविंद्र घरत

___________

Also see :  रिंगरूटमध्ये बाधित होणाऱ्या बांधकामांवर मनपाची निष्कासनाची कारवाई

https://www.theganimikava.com/Corporation-eviction-action-on-constructions-that-are-obstructing-the-ring-route