अंगणवाडी मधील लहान मुलं व गर्भवती महीलांच्या पुरक पोषक आहाराचा काळाबाजार
काळाबाजार करणाऱ्या महिलेला मानपाडा पोलिसांनी पकडले
अंगणवाडी मधील लहान मुलं व गर्भवती महीलांच्या पुरक पोषक आहाराचा काळाबाजार
काळाबाजार करणाऱ्या महिलेला मानपाडा पोलिसांनी पकडले
५९ हजार ८१३ रुपयांची अन्नधान्य पाकिटे आणि इतर उपयोगी वस्तू केल्या जप्त
कल्याण (kalyan) : अंगणवाडी मधील लहान मुलांना व गर्भवती महीलांना शासनाकडुन पुरक पोषक आहार दिला जातो, यामध्ये भ्रष्टाचाराची किड लागली आहे. पुरक पोषक आहाराचा काळाबाजार करणाऱ्या महिलेला मानपाडा पोलिसांनी पकडले असून ५९ हजार ८१३ रुपयांची अन्नधान्य पाकिटे आणि इतर उपयोगी वस्तू जप्त केल्या आहेत.
निळजे सेक्टर, डोंबिवली पुर्व अंतर्गत येणा-या अंगणवाड़ी मधिल लहान मुलांना व गर्भवती महीलांना शासनाकडुन पुरक पोषक आहार योजनेतील जिवनावश्क वस्तुच्या वितरणात अनियमीतता होत असल्याबाबत गोपनिय माहिती जिल्हा परीषद ठाणे, अधिकारी संतोष भोसले आणि जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील यांना मिळाली. त्यांनी ही माहिती लगेच मानपाडा पोलिसांना कळवली. तात्काळ मानपाडा पोलिसांनी ट्रॅप लावत काळाबाजार होत असलेला टेम्पो रंगेहात पकडला आहे. या टेम्पो मध्ये तेल, गहू, तांदूळ, हळद, मसाला, साखर यांची पाकिटे आणि इतर आवश्यक असलेले वस्तू आढळून आल्या. अन्नधान्य आणि साहित्याची एकूण किंमत ५९,८१३ इतकी असून सर्व माल पोलिसांनी जप्त केला आहे. सदर काळाबाजार अंगणवाडी परिवेक्षिका सुषमा घुगे ही करत असून पोलिसांनी तिला रंगेहात पकडले असून कलम ४२० आणि ४०९ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई सपोनि सुरेश डांबरे, पोहवा काटकर, पोना काळे, पोशि भोसले, ढाकणे, घुगे, मपोना थोरात यांच्या पथकाने केली आहे.
कल्याण, ठाणे
प्रतिनिधी-कुणाल म्हात्रे
_______
Also see : माकुणसार खाडीवरील पुलाची नव्याने उभारणी, पर्यायी मार्गाची दैनीय अवस्था