अंगणवाडी पोषण आहारात मोठा घोळ!!

14 वर्षापासून अंगणवाड्या चालू असून सुद्धा लाभार्थी वंचित!! कायदेशीर कारवाई करण्याची महाराष्ट्र पत्रकार असोसिएशनची मागणी!!

अंगणवाडी पोषण आहारात मोठा घोळ!!
Big mix in Anganwadi nutrition diet

अंगणवाडी पोषण आहारात मोठा घोळ!!

14 वर्षापासून अंगणवाड्या चालू असून सुद्धा लाभार्थी वंचित!! कायदेशीर कारवाई करण्याची महाराष्ट्र पत्रकार असोसिएशनची मागणी!! 

महिला व बाल विकास विभागामार्फत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेची अंमलबजावणी ग्रामीण भागात आदिवासी विभाग आणि शहरी झोपडपट्ट्यांमध्ये पुरवली जाते परंतु कांदिवली व मुंबई मधील अंगणवाडी सेविका व त्यांच्या अंगणवाड्या कोठे चालतात व कशा चालतात कशा प्रकारे मुलांना पोषण आहार पुरविला जातो कदाचित त्यांनाच माहीत असावे. गेल्या 12 ते 14 वर्षापासून या विभागात अंगणवाडी चाललात परंतु या सेविकांचे कार्य त्यांना दिलेल्या चाळीत जाऊन त्या ठिकाणी असलेल्या गर्भवती महिलांची पाहणी करणे त्यांची नोंद करणे वरिष्ठ अधिकाऱ्यांना यादी देणे हे कार्य दर तीन ते सहा महिन्यांनी करणे अनिवार्य आहे व त्यांना शासनामार्फत गर्भवती महिलांना पोस्टीक आहार पुरविणे व १ वर्षापासून ते 3 वर्षापर्यंत त्या बालकांना पोषण आहार आरोग्य निगा आणि अंगणवाडीत शाळा पूर्व शिक्षण याची सेवा पुरवणे हे त्याचे कार्य असतानाही या विभागातील अनेक ठिकाणी अंगणवाडी सेविकांनी सर्वे केला नाही गर्भवती बायकांची नोंद केली जात नाही त्याचबरोबर जन्मा पासून ते तीन वर्षी पर्यंत च्या बालकांचे नाव नोंद केले जात नाही. अशी असंख्य कुटुंब आहेत की त्यांना शासनाच्या योजनेचा फायदा झालाच नाही नाव नोंदणी असूनही आहार मिळत नाही कांदिवली व मुंबईत स्थानिक रहिवाशी असलेले सुनील गायकवाड यांना याची माहिती मिळताच त्यांनी अंगणवाडी सेविकांची विचारणा केली असता यांना उलट उत्तर देण्यात आले की ही चाळ आमच्याकडे नाही असे उत्तर देऊन करण्यात आली तुमच्या वरिष्ठ अधिकार्‍यांचा नंबर द्या असे विचारले असता नंबर देण्यात आला नाही. कार्यालयाचा पत्ता देण्यात आला नाही शेवटी सुनील गायकवाड यांनी महिला व बालविकास विभागात महाराष्ट्र शासन मंत्रालयात तक्रार दाखल केली.

तेव्हा वरिष्ठ अधिकारी व अंगणवाडी सेविका सुपरवायझर केळसकर यांनी सुनील गायकवाड यांच्याशी संपर्क करून दिनांक 6 ऑक्टोंबर 2020 मंगळवार रोजी क्रांतीनगर विभागात बैठक घेण्यात आली या बैठकीत अंगणवाडी सेविका व त्यांच्या सुपरवायझर केळसकर मॅडम आणि स्थानिक पोषण आहारापासून वंचित असलेल्या राहिलेल्या महिला वर्ग यांच्यात बाचाबाची झाली. तोंड पाहून पोषक आहार दिला जातो महिलांचे बालकांचे नाव नोंदणी असूनही त्यांना पुरेपूर पोषक आहार मिळत नाही असा सूर सर्व  महिलांचा होता आणि ठिकाणी नोंदणी आणि अंगणवाडी यांचा तर पत्ताच नाही. या बैठकीचा निष्कर्ष काही लागला नाही लाभार्थ्यांना लाभ दिला जाईल असे सांगण्यात आले परंतु ठोस निर्णय घेण्यात आला नाही. लोकांचा विचार केला गेला नाही प्रश्न असा पडतो की वरिष्ठ अधिकारी काय करतात? सुपरवायझर व अधिकारी प्रत्येक विभागाची पाहणी करतात का? कधी करतात? त्याच्या निदर्शनात वंचित राहिलेले कुटुंब महिला व बालक आहेत का ?प्रत्येक अंगणवाडी कोठे चालते? अंगणवाड्या त्या विभागात चालतात का नाही मुले अंगणवाडीत येतात का नाही? त्यांची नोंद योग्य पद्धतीने केली का नाही ?केली असेल तर तीन ते सहा महिन्यात वरिष्ठ अधिकाऱ्याने किती बैठका घेतल्या किती वेळा मीटिंग लावल्या पालकांची होम व्हिजीट केली का आज हा प्रश्‍न निर्माण झाला नसता व अनेक महिला व बालक पोषण आहारापासून वंचित राहिले नसते अंगणवाडी सेविकांचे कार्य व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे काम सर्व अंदाधुंद कारभार सुरू आहे.

यावरून हे निष्पन्न होते की हे अधिकारी शासनाचा पगार घेऊन शासनाची व जनतेची दिशाभूल करत आहेत. असे निदर्शनास येते यावेळी महाराष्ट्र पत्रकार असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष संजय बोर्डे यांनी या अंगणवाडी सेविका व सुपरवायझर यांना विचारणा केली असता त्यांच्याकडून योग्य ते उत्तर मिळाले नाही याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री महानगरपालिका सामाजिक न्याय विभाग महिला व बालकल्याण विभाग यांच्याकडे तक्रार केली आहे.

मुंबई

प्रतिनिधी - संजय बोर्डे

_____________

Also see : मुख्यमंत्री योगी राजीनामा द्या -  मातंग समाजाची मागणी

https://www.theganimikava.com/Resign-Chief-Minister-Yogi--Demand-of-Matang-community