भिवंडीमध्ये चायना वस्तूंचा बहिष्कार; मेड इन चायना वस्तू केल्या आगीत खाक

भिवंडीमध्ये चायना वस्तूंचा बहिष्कार;जाळपोळ करतानाचा व्हिडिओ व्हायरल

भिवंडीमध्ये चायना वस्तूंचा बहिष्कार; मेड इन चायना वस्तू केल्या आगीत खाक

सोमवारी रात्री लद्दाख मध्ये चीनच्या सैनिकांकडून भारतीय सैनिकांवर झालेल्या हल्ल्यामुळे देशभर सगळ्यांनी टीका करत चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकला. आज आज भिवंडी शहर चे भाजपा नगरसेवक आणि त्यांचे समर्थक यांनी चिनी वस्तूंना जाळून आपला चिनी वस्तू खरेदी करण्यास सक्त विरोध आहे असे दर्शवले.
भिवंडीमध्ये भाजपचे नगरसेवक निलेश चौधरी आणि व्यापारी यांनी मिळून मेड इन चायना वस्तूंचा विरोध करत चीनच्या प्रधानमंत्र्यांच्या पुतळा जाळला आणि चीनमध्ये बनलेल्या टीव्ही बॅटरी मोटर सायकल सायकल कम्प्युटर मोबाईल प्रत्येक चायनीज वस्तूचा जाळून खरेदी करण्यास विरोध दाखवला. 15 आणि 16 जूनला रात्री झालेल्या गलवान खोऱ्यात चायनाचे धोकेबाज सैनिकांनी अचानक भारतीय जवानांवर हल्ला केला होता.

ज्या हल्ल्यामध्ये भारताचे 20 जवान शहीद झाले त्याचा विरोध आज पूर्ण देशभर केला जात आहे जनते बरोबरच व्यापारी सुद्धा चिनी वस्तूंना विरोध करत आहेत देशाच्या शहीद जवानांना श्रद्धांजली करत आज भिवंडी मध्ये अंजुर फाटा महावीर चौक येथे चायना वस्तू ना जाळत सर्वांनी शपथ घेतली की आज नंतर परत कधीच चायना मध्ये बनलेली कोणतीच वस्तू खरेदी किंवा विक्री करणार नाही असे सांगितले व यानंतर भारतीय शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली.