बीड फॅशन शो मध्ये हार्मिका जगतकर प्रथम

आरजे ड्रीमलैंड आयोजित फॅशन शो 2021 ची विजेता कु. हार्मीका बालाजी जगतकर हिने बाल गटातून प्रथम पारितोषिकाची मानकरी ठरली आहे.

बीड फॅशन शो मध्ये हार्मिका जगतकर  प्रथम
Beed Fashion Show

बीड फॅशन शो मध्ये हार्मिका जगतकर प्रथम

आरजे ड्रीमलैंड आयोजित फॅशन शो 2021 ची विजेता कु. हार्मीका बालाजी जगतकर हिने बाल गटातून प्रथम पारितोषिकाची मानकरी ठरली आहे.

बीड जिल्हाप्रतिनिधी  विश्वनाथ शरणांगत:

बीड दि .13 आरजे ड्रीमलैंड आयोजित फॅशन शो 2021 ची विजेता कु. हार्मीका बालाजी जगतकर हिने बाल गटातून प्रथम पारितोषिकाची मानकरी ठरली आहे, प्रथम पारितोषक विभागुन देण्यात आले, कोरोना काळात दोन वर्षा  बंद असलेल्या स्पर्धा यावर्षी घेण्यात आली त्यामध्ये बीड जिल्ह्यातील अनेकानी  सहभाग नोंदवला, या फॅशन शोच्या प्रमुख आकर्षण रुबरू मिस इंडिया नोबेल क्वीन मिस वर्ल्ड  नोबल  क्वीन इंटरनॅशनल दिव्य शेट्टी या होत्या तर प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ.सारिका क्षीरसागर, संयोजक रविराज जेधे, तुलशी कॉलेज ऑफ फॅशन डिझायनिंग, सि.एन,एस, फिटनेस, सिद्धार्थ  डी.जे, मॅजिक फोटो, सौभाग्य लॉन्स, दोसा प्लाझा, जि-मार्ट, असमीस् लिलन हब, साखरे मंडप तसेच मिडिया पाटनर दैनिक प्रारंभ या बीड शहरातील अनेक नामांकित सहयोगी फॉर्मचे प्रतीनिधी यांच्या उपस्थिती मध्ये हा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण नाटयगृह बीड मध्ये मोठ्या झगमगटात, प्रसन्न वातावरनात, शानदार,नेत्रदिपक लाईटींग, कर्णमधुर आवाजात  संपन्न झाला.(Beed Fashion Show)

 फॅशन शो मध्ये दोन गटा मध्ये आयोजीत केली गेली होती, यात  प्रथम, द्वितीय , तृतीय, अशा स्वरूपात स्पर्धक निवडले गेले,त्यात तुलशी इंग्लिश स्कुल मध्ये इयत्ता ८ वी ची विद्यार्थिनी व दैनिक दिव्य अग्नी चे जिल्हा प्रतिनिधी बालाजी जगत कर यांची मुलगी कु. हार्मिका बालाजी जगतकर हिने  प्रथम पारितोषक विभागुन देण्यात आले,त्याचे नांव पृथ्वी आहे, सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे, या कार्यक्रमाला बीड करानी  भरभरून प्रतिसाद दिला.(Beed Fashion Show)