बीड काँग्रेसची मागणी; उत्तर प्रदेश मध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा ...
देशात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होत चालला आहे, गेल्या काही दिवसापासून उत्तर प्रदेश राज्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे...

बीड काँग्रेसची मागणी उत्तर प्रदेश मध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा ...
बीड : देशात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होत चालला आहे, गेल्या काही दिवसापासून उत्तर प्रदेश राज्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांची हत्या, बलात्कार, नाॅपलॉचीन, जातिवाद यासारखे घटना सतत होत आहेत व घडत आहेत. उत्तर प्रदेश मधील हाथरस येथील घटनेच्या संबंधित सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी. या घटनेचे संबंधित पोलिसांना परिस्थिती नुसार करावे, हा संघटना प्रकरण उत्तर प्रदेशात बाहेर इतरत्र चालवावे, उत्तर प्रदेश राज्यांमध्ये यासारख्या गंभीर घटना चालू आहेत. त्या राज्याला राष्ट्रपती राजवट चालू करावी. अशी मागणी बीड जिल्हा काँग्रेस च्या वतीने आज गांधी जयंतीच्या निमित्ताने करण्यात आली आहे.
प्रदेशमध्ये कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे रसातळाला गेली आहे, प्रशासन ती हाताळण्यात असमर्थ आहे. याकरिता गांधी जयंतीचे औचित्य साधून आज बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यामध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पापा मोदी जिल्हा प्रभारी सत्संग मुंडे, अमर खानापुरे, अॅड.राहुल साळवे, दादासाहेब मुंडे, गोविंद साठे, नागेश मीठे पाटील अरुण कांबळे संतोष निकाळजे अविनाश डरफे, योगेश शिंदे महादेवांना धांडे, मिठू वाघमारे, दत्तात्रेय सौंदरमल आदीसह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बीड
प्रतिनिधी - विश्वनाथ शरणांगत
___________
Also see : हाथरस घटनेच्या निषेधार्थ आरपीआयची निदर्शने
https://www.theganimikava.com/RPI-protests-against-Hathras-incident