देशिंग-लक्ष्मीखिंड रस्त्याची दुरावस्था, म्हैशाळ कॅनाॅलवरील पुलाआभावी रस्त्याचे काम ठप्प

देशिंग ते लक्ष्मीखिंड व्हाया माळी वावरे वस्ती रस्त्याची अगदीच  दुरावस्था झाली आसुन, सदर रस्त्यावरून प्रवास करणे मोठे कसरतीचे ठरत आहे. त्यामुळे तात्काळ या रस्त्याची दुरूस्तीची  मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.

देशिंग-लक्ष्मीखिंड रस्त्याची दुरावस्था, म्हैशाळ कॅनाॅलवरील पुलाआभावी रस्त्याचे काम ठप्प
देशिंग-लक्ष्मीखिंड रस्त्याची झालेली दुरवस्था
देशिंग-लक्ष्मीखिंड रस्त्याची दुरावस्था, म्हैशाळ कॅनाॅलवरील पुलाआभावी रस्त्याचे काम ठप्प

देशिंग-लक्ष्मीखिंड रस्त्याची दुरावस्था, म्हैशाळ कॅनाॅलवरील पुलाआभावी रस्त्याचे काम ठप्प

घाटनांद्रे/वार्ताहर : देशिंग ते लक्ष्मीखिंड व्हाया माळी वावरे वस्ती रस्त्याची अगदीच  दुरावस्था झाली आसुन, सदर रस्त्यावरून प्रवास करणे मोठे कसरतीचे ठरत आहे. त्यामुळे तात्काळ या रस्त्याची दुरूस्तीची  मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.

सदर रस्ता हा पंचायत समितीच्या अखत्यारीत येत  आसुन,यामार्गाने देशिंग ते लक्ष्मीखिंड मार्गे पुढे खंडेराजुरीला जाणे जवळचा ठरत आसल्याने त्याचबरोबर सदर भागात वस्तीभाग मोठ्या प्रमाणात आसल्याने येथे प्रवाशांची नेहमी वर्दळ आसते.सध्या पावसाचे दिवस आसल्याने हा रस्ता संपूर्ण चिकलमय झाला आसुन, जागोजागी लहानमोठे खड्डे पडल्याने प्रवास करणे अगदी  जिकिरीचे बनले आहे. त्यामुळे अनेक लहानमोठे अपघात घडत आहेत.

सदर रस्त्या दरम्याने  म्हैशाळ योजनेचा कॅनाल जात आहे. येथे पुल असणे आवश्यक व गरजेचे आहे.तोच नसल्याने या रस्त्याचे काम करता येत नाही.संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे.यावर तोडगा निघणे आवश्यक असल्याचे मत बनेवाडीचे माजी ग्रामपंचायत सदस्य प्रविण माळी व चंद्रकांत जगताप यांनी यावेळी बोलताना सांगितले.

सदर रस्ता हा मोठा वर्दळीचा आसुन लक्ष्मीखिंडी मार्गे खंडेराजुरी व इतर गावांना मधून जाण्यासाठी सोयीस्कर व सोपा पडत आहे.सध्या या रस्त्याची अगदीच  दुरावस्था झाली आसुन.वेळोवेळी संबंधित विभागाकडे मागणी करून ही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.यावर विचार होणे गरजेचे आहे. 
       प्रविण माळी (माजी ग्रामपंचायत सदस्य बनेवाडी) व चंद्रकांत जगताप (सामाजिक कार्यकर्ते बनेवाडी)

सांगली
प्रतिनिधी - जगन्‍नाथ सकट

____________

Also see : सध्या प्रदूषण नियंत्रण मंडळाचे काम केवळ नोटिसा बजावणे ? प्रदूषण करणार्‍या बड्या कारखानदारांवर कारवाई कधी करणार ? - श्री. मनोज खाडये

https://www.theganimikava.com/Currently-the-job-of-the-Pollution-Control-Board-is-to-serve-only-notices-When-will-action-be-taken-against-big-polluters-Mr-Manoj-Khadye