भाजपा शिक्षक आघाडीची कल्याण पूर्व कार्यकारणी जाहीर
शिक्षक दिनाचे औचित्य साधून भाजपा शिक्षक आघाडीची कल्याण पूर्व कार्यकारणी जाहीर करण्यात आली

भाजपा शिक्षक आघाडीची कल्याण पूर्व कार्यकारणी जाहीर
कल्याण पूर्व अध्यक्षपदी अविनाश ओंबासे यांची नियुक्ती
कल्याण (kalyan) : शिक्षक दिनाचे (teachers day) औचित्य साधून भाजपा शिक्षक आघाडीची कल्याण (kalyan) पूर्व कार्यकारणी जाहीर करण्यात आली. कल्याण (kalyan) पूर्वेतील तिसाई हाउस याठिकाणी आमदार गणपत गायकवाड यांच्या उपस्थितीत नवनियुक्त पदाधिकार्यांना पद नियुक्ती प्रमाणपत्र देण्यात आले.
शिक्षक आघाडीच्या कल्याण (kalyan) पूर्व अध्यक्षपदी अविनाश ओंबासे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर सरचिटणीसपदी ललिता मोरे, सुप्रिया नाईकर, राहुल खंदारे, उपाध्यक्षपदी श्रीकांत त्रिपाठी, मुकुंद गायधनी, सुधाकर ठोके, सुभाष गायकवाड, तेज नारायण सिंह, उर्मिला सिंह, नसीम शेख, चिटणीसपदी संगीता वर्मा, सचिदानंद तिवारी, राम निंबाळकर, लीपिका पाल, जगतनारायण उपाध्याय, भानू प्रताप सिंह, अविनाश पाटील, राकेश कुरकुरे, विमलेश दुबे, विकास गुप्ता, प्रभुनारायण दुबे, अरविंद मोरे, सदस्यपदी जितेंद्र महाजन, संजय उपाध्याय, सुहास गायकवाड, कविता कुशवाह अशी जम्बो कार्यकारिणी घोषित करण्यात आली.
कल्याण (kalyan) पूर्व मधील सर्व शैक्षणिक क्षेत्रातील तज्ञ मुख्याध्यापक व शिक्षकांनी एकत्र येऊन कल्याण (kalyan) पूर्वच्या विकासात्मक कामे याबद्दल आपले योगदान द्यावे. तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे कोणतेही प्रश्न, अडचणी आणि समस्या असतील तर ते शेवटच्या घटकापर्यंत जाऊन सोडवण्यासाठी मी नेहमीच तत्पर असतो आणि पुढेही असेल असे आश्वासन आमदार गणपत गायकवाड यांनी यावेळी दिले.
कल्याण,ठाणे
प्रतिनिधी-कुणाल म्हात्रे
______
Also see : कल्याणचा दुर्गाडी किल्ला राज्यशासनाने संवर्धित करावा
https://www.theganimikava.com/The-fort-of-Kalyan-should-be-nurtured-by-the-state-governmen