एन.आर.सी. शाळेतील क्वारंटाइन सेंटर त्वरित सुरु करण्याची भा.ज.यु.मोर्चाची मागणी

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता आरोग्य व्यवस्था अपुरी पडत असून रुग्णांना उपचार मिळण्यासाठीविविध ठिकाणी कोविड सेंटर आणि  क्वारंटाइन सेंटर उभारण्याचे काम सुरु आहे.....

एन.आर.सी. शाळेतील क्वारंटाइन सेंटर त्वरित सुरु करण्याची भा.ज.यु.मोर्चाची मागणी
BJP demands immediate start of quarantine center in NRC schools
एन.आर.सी. शाळेतील क्वारंटाइन सेंटर त्वरित सुरु करण्याची भा.ज.यु.मोर्चाची मागणी

एन.आर.सी. शाळेतील क्वारंटाइन सेंटर त्वरित सुरु करण्याची भा.ज.यु.मोर्चाची मागणी

कल्याण (kalyan) : कल्याण डोंबिवली महानगरपालिका (muncipal corporation) क्षेत्रातील वाढती कोरोना (corona) रुग्णसंख्या लक्षात घेता आरोग्य व्यवस्था अपुरी पडत असून रुग्णांना उपचार मिळण्यासाठी विविध ठिकाणी कोविड सेंटर आणि  क्वारंटाइन सेंटर उभारण्याचे काम सुरु आहे. अशाच प्रकारे मोहने येथील एन.आर.सी. शाळेत देखील पालिकेने क्वारंटाइन सेंटर उभारले असून ते अद्यापही सुरु केले नाही. त्यामुळे हे क्वारंटाइन सेंटर त्वरित सुरु करण्याची मागणी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे ठाणे विभाग उपाध्यक्ष सुशीलकुमार पायाळ यांनी पालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे  केली आहे.

       कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ‘अ’ प्रभागात आंबिवली, मोहने परिसरात  मोठी लोकसंख्या असून याठिकाणी देखील कोरोना (corona) रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे येथील रुग्णांना उपचारासाठी कल्याण डोंबिवली भिवंडी आदी ठिकाणी जावे लागत आहेत. नागरिकांचा हा त्रास वाचविण्यासाठी महानगरपालिकेने मोहने येथील एन.आर.सी. शाळेत क्वारंटाइन सेंटर उभारले आहे. मात्र अद्यापही ते उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे.

       त्यामुळे पालिकेने योग्य त्या उपाययोजना करून आणि पुरेसे मनुष्यबळ देऊन हे क्वारंटाइन सेंटर तात्काळ सुरु करून करदात्या नागरिकांना होणाऱ्या नाहक त्रासापासून वाचविण्याची मागणी  सुशीलकुमार पायाळ यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.

कल्याण , ठाणे
प्रतिनिधी - कुणाल म्हात्रे

________

Also see : एनयूजेच्या राष्ट्रीय अधिवेशनात पत्रकारांवर बनावट खटले दाखल करण्याविरोधात आवाज उठविला

https://www.theganimikava.com/At-the-NUJ-National-Convention-voices-were-raised-against-filing-fake-lawsuits-against-journalists