कोविड सेंटर मधील महिलांच्या सुरक्षेसाठी भाजपा महिला मोर्चा आक्रमक
पोलीस उपायुक्त आणि पालिका आयुक्तांना दिले निवेदन....

कोविड सेंटर मधील महिलांच्या सुरक्षेसाठी भाजपा महिला मोर्चा आक्रमक
पोलीस उपायुक्त आणि पालिका आयुक्तांना दिले निवेदन
कल्याण : कोविड सेंटरमध्ये (covid centre) महिलांकरीता स्वतंत्र वॉर्डाची निर्मिती करून तिथे उपचाराकरीता महिला स्टाफची नेमणूक करून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी तसेच कोविड सेंटरमध्ये महिला रूग्णांच्या सुरक्षीततेसाठी महिला पोलीसांची नेमणूक करण्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीचे महिला मोर्चा आक्रमक झाले असून महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा अध्यक्षा उमा खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण डोंबिवली जिल्हा अध्यक्षा नगरसेविका रेखा राजन चौधरी यांनी पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांची भेट घेत निवेदन दिले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना (corona) महामारिची परिस्थिती अतिशय गंभीर होत चालली आहे. त्यातच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोविड सेंटरमध्ये (covid centre) महिला अत्याचाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळेच एकूण महिला सुरक्षीततेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. त्यामुळे प्रत्येक कोविड सेंटरमध्ये (covid centre) महिला रूग्णांच्या सुरक्षिततेकरीता प्रत्येक कोविड सेंटरमध्ये(covid centre) २४ तास महिला पोलीस कॉन्स्टेबलांची नेमणूक करण्यात यावी. त्याचप्रमाणे रात्रीच्या वेळेस प्रत्येक कोविड सेंटरमध्ये (covid centre) महिला पोलीसांमार्फत गस्त घालण्याची मागणी पोलीस उपायुक्तांकडे करण्यात आली.
तर कोविड सेंटरमध्ये (covid centre) स्वतंत्र महिला वॉर्ड निर्माण करून प्रत्येक कोविड सेंटरमध्ये (covid centre) सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत व आपत्कालीन पॅनिक बटन बसविण्यात यावे. महिला वॉर्डमध्ये महिलांच्या उपचारासाठी स्वतंत्र महिला स्टाफ नेमण्याची मागणी पालिका आयुक्तांकडे करण्यात आली. या मागण्या लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास भाजपा (BJP) महिला मोर्चातर्फे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी जिल्हाध्यक्षा रेखा चौधरी यांनी दिला आहे. यावेळी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रिया शर्मा, जिल्हा सरचिटणीस पुष्पा रत्नपारखी, डोंबिवली ग्रामीण अध्यक्षा मनीषा राणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
कल्याण, ठाणे
प्रतिनिधी - कुणाल म्हात्रे
________
Also see : बारा तास मृतदेह दवाखान्यात पडून असल्याने कोरोनाबाधित पित्याचा मुलांनाच करावा लागला अंत्यविधी .....