लग्नाच्या वाढदिवशी तलवारीने केक कापला

बायकोसमोर शाईनिंग, लग्नाच्या वाढदिवशी तलवारीने केक कापला, नवरोबाला बेड्या समाजात दहशत निर्माण करण्यासाठी आरोपी पतीने घरी चक्क तलवारीने केक कापला .

लग्नाच्या वाढदिवशी तलवारीने केक कापला
Aurangabad news

लग्नाच्या वाढदिवशी तलवारीने केक कापला

On the wedding anniversary the sword cut the cake

बायकोसमोर शाईनिंग, लग्नाच्या वाढदिवशी तलवारीने केक कापला, नवरोबाला बेड्या
समाजात दहशत निर्माण करण्यासाठी आरोपी पतीने घरी चक्क तलवारीने केक कापला .

बायकोसमोर फुशारकी मारण्याचा सोस नवऱ्याच्या चांगलाच अंगलट आला. औरंगाबादमधली तरुणाने लग्नाच्या वाढदिवशी चक्क तलवारीने केक कापण्याचा ‘पराक्रम’ केला. मात्र याची खबर पोलिसांना लागताच मिजासखोर नवरोबाला बेड्या पडल्या आहेत. 

सराईत आरोपी दीपक सरकटे याच्या लग्नाचा नुकताच वाढदिवस झाला.  बायकोसमोर फुशारकी मारण्याची हुक्की त्याला आली. त्यामुळे समाजात दहशत निर्माण करण्यासाठी त्याने चक्क तलवारीने केक कापला. कुटुंबीयांच्या समोरच बायकोसोबत त्याने तलवारीने केक कटिंग केले. या प्रकाराचा व्हिडीओही शूट करण्यात आला होता.

तलवारीने केक कापून दहशत निर्माण करणे दीपकला चांगलेच महागात पडले. अवैध शस्त्र बाळगल्या प्रकरणी औरंगाबादमधील पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलं आहे. काही तासांतच केक कापणाऱ्या पतीला अटक करण्यात आली.

सार्वजनिक ठिकाणी तलवारीने केक कापणाऱ्या तरुणाला तीन महिन्यांपूर्वी पुण्यातील गणेश पेठ परिसरात पोलिसांनी अटक केली. समीर अनंत ढमाले  याने भर रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी पौराणिक तलवारीने केक कापून आपला वाढदिवस साजरा केला होता. त्यावर कारवाई करत पोलिसांनी त्याला अटक केली होती.

दुसरीकडे, पुणे गुन्हे शाखा युनिट 1 च्या पोलिसांनी कारवाई करत समीर ढमालेला अटक केली आहे. त्याच्याकडून 26 इंच लांबीचे दुधारी पाते आणि 200 रुपये किमतीची 6 लांबा नक्षीदार मुठ असलेली पौराणिक तलवार हस्तगत करण्यात आलेली आहे. समीर अनंत ढमाले राहणारा गणेश पेठ लोणकर वाडा याला पोलिसांनी अटक केली आहे.

 यासाठी पुणे शहर पोलीस अभिलेखावरील टोळीतील गुंड, फरार आरोपी आणि तडीपार असलेले गुन्हेगार यांचा शोध घेवून त्यांच्या हालचालींवर नजर ठेवून त्यांच्याविरुध्द कठोर कारवाई करण्याचे आदेश सर्व पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आलेत.

पुणे शहरामध्ये कोणत्याही प्रकारे अनुचित प्रकार घडून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही.