महिला अत्याचार : महाराष्ट्रातील आघाडी सरकारच्या ‘दिव्याखाली अंधार’ !

भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांची टीका...

महिला अत्याचार : महाराष्ट्रातील आघाडी सरकारच्या ‘दिव्याखाली अंधार’ !
Atrocities against women: Maharashtra's alliance government's 'darkness under the lamp'
महिला अत्याचार : महाराष्ट्रातील आघाडी सरकारच्या ‘दिव्याखाली अंधार’ !

महिला अत्याचार : महाराष्ट्रातील आघाडी सरकारच्या ‘दिव्याखाली अंधार’ !

 भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांची टीका

पुणे पिंपरी (Pune Pimpri): राज्यातील महिला अत्याचारांविरोधात भोसरीत ‘आक्रोश आंदोलन’ देशभराच्या आकडेवारीत महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे. मात्र, महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार आणि नेत्यांना उत्तरप्रदेशमध्ये होणाऱ्या अत्याचाराच्या घटना दिसतात. पण, महाराष्ट्रातील महिला अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी कोणतीही ठोस भूमिका घेतली जात नाही, अशी टीका भाजपाचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी केली. 
महाराष्ट्रातील वाढत्या महिला अत्याचाराच्या घटनांविरोधात भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या पुढाकाराने भोसरी येथे सोमवारी सकाळी ‘आक्रोश आंदोलन’ करण्यात आले. यावेळी आमदार लांडगे बोलत होते. 
आंदोलनानंतर तहसीलदार कार्यालयात महिला मोर्चोच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. महाविकास आघाडी सरकारने राज्यातील महिलांना सुरक्षित वातावरण दिले नाही. तर भाजपाच्या महिला पदाधिकारी कायदा हातात घेतील, असा इशाराही आमदार लांडगे यांनी दिला आहे.
यावेळी शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप,  
महापौर उषा उर्फ माई ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे, महिला मोर्चा प्रदेश अध्यक्ष उमाताई खापरे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, प्राधिकरण माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, प्रदेश सचिव अमित गोरखे, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, सरचिटणीस राजू दुर्गे, सरचिटणीस विजय फुगे, सरचिटणीस बाबू नायर, महिला मोर्चा अध्यक्ष उज्वला गावडे, माजी महापौर नितीन (अप्पा) काळजे, राहुलदादा जाधव
 नगरसेविका सीमा सावळे, शैलजा मोरे, झामाबाई बारणे, स्वीनल म्हेत्रे, प्रियांका बारसे, शर्मिला बाबर, शारदा सोनावणे, सुजाता पालांडे, उषा मुंढे, आरती चोंधे, निर्मला कुटे, सारिका लांडगे, सविता खुळे, आशा शेंडगे, अश्विनी जाधव, नम्रता लोंढे, कमल घोलप, अनुराधा गोरखे,निर्मला गायकवाड, साधना मळेकर, नगरसेवक विलास मडीगेरी, नितीन लांडगे, संजय नेवाळे, एकनाथ पवार, विकास डोळस,कुंदन गायकवाड,उत्तम केंदळे, सुरेश भोईर, केशव घोळव, मंडल अध्यक्ष  योगेश चिंचवडे,विजय शिनकर, महादेव कवितके, शैला मोळक, पल्लवी वाल्हेकर, भारती विनोदे, रंजना चिंचवडे, दिपाली धनोकार आदी सर्व प्रदेश पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी व मंडल पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन स्वीकृत नगरसेवक मोरेश्वर शेडगे यांनी केले, तर आभार मंडलअध्यक्ष राजेंद्र लांडगे यांनी मानले. 

राज्य सरकार झोपले आहे का? 

आमदार महेश लांडगे म्हणाले की, भारतीय संस्कृतीमध्ये महिलांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. स्त्री कोणत्याही समाजाची असुद्या, तिच्याप्रति आदर असला पाहिजे. हिंदवी स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर राजमाता जिजाउ यांचे संस्कार होते. छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात देशात सर्वाधिक महिलांवर अत्याचार होत आहेत, ही बाब चिंताजनक आहे. त्याकडे महाविकास आघाडी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आणि महिलांचा आक्रोश सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही हे आंदोलन केले आहे. उत्तरप्रदेशमधील घटना दुर्दैवी आहे. पण, महाराष्ट्रातील वाढत्या घटनांबाबत महाविकास आघाडी सरकार झोपले आहे का? असा प्रश्नही लांडगे यांनी उपस्थित केला आहे.

पिंपरी, पुणे 

प्रतिनिधी - आत्माराम काळे

____________

Also see : ‘औद्योगिकनगरी’ पिंपरी-चिंचवडचा रहिवाशी असल्याचा मला अभिमान!

https://www.theganimikava.com/I-am-proud-to-be-a-resident-of-Industrial-City-Pimpri-Chinchwad