आश्रमशाळेचे गतवर्षाचे परिपोषण अनुदान न मिळाल्यामुळे आश्रमशाळा संस्थाचालकांचे जिल्हाधिकारी कार्यालयापुढे धरणे आंदोलन
इतर मागास व बहुजन कल्याण विभाग यांच्या आधिपत्याखालील विजाभज आश्रमशाळाचे सन 2019- 20 या शैक्षणिक वर्षात संस्थेने निवासी विद्यार्थ्यासाठी परिपोषण व इतर बाबींवर खर्च केलेले परिपोषण अनुदान नियमाप्रमाणे मार्च 2020 मध्ये देणे आवश्यक होते.....

आश्रमशाळेचे गतवर्षाचे परिपोषण अनुदान न मिळाल्यामुळे आश्रमशाळा संस्थाचालकांचे जिल्हाधिकारी कार्यालयापुढे धरणे आंदोलन
इतर मागास व बहुजन कल्याण विभाग यांच्या आधिपत्याखालील विजाभज आश्रमशाळाचे सन 2019- 20 या शैक्षणिक वर्षात संस्थेने निवासी विद्यार्थ्यासाठी परिपोषण व इतर बाबींवर खर्च केलेले परिपोषण अनुदान नियमाप्रमाणे मार्च 2020 मध्ये देणे आवश्यक होते. आश्रमशाळांना अनुदान देण्याची प्रक्रिया चालू असतानाच कोरूनाच्या पार्श्वभूमीवर वित्त विभागाने संगणक प्रणाली बिल पोर्टल बीडीएस बंद केल्यामुळे अनेक आश्रमशाळाना परिपोषण अनुदान मिळाले नाही. शासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही अनुदान मिळाले नाही म्हणून सातारा जिल्ह्यातील आश्रमशाळा संस्थाचालक यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहेत. असे निवेदन मा जिल्हाधिकारी सातारा यांना दि 7/9/2020 रोजी देऊन त्यांच्या मार्फत शासन व प्रशासन कळविण्यात यावे अशी विनंती केली होती. तसेच संघटनेच्या वतीने ई-मेल द्वारा निवेदन देऊन शासन व प्रशासनास कळविण्यात आले होते. शासनाने निवेदनाची गंभीर दखल घेऊन पाईपोषण अनुदान देतील अशी संस्थाचालकांना अपेक्षा होती मात्र शासन व प्रशासन निवेदनाची दखल न घेतल्यामुळे संस्थाचालक वेदनादायी झालेले आहोत.
विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच मागासवर्गीय मुला-मुलींच्या आश्रमशाळा बाबतीत शासन व प्रशासन गंभीर नाही. त्यामुळे आज दिनांक 22/09/ 2020 रोजी सातारा जिल्हा आश्रमशाळा संस्थाचालक यांनी त्यांच्या व न्याय व हक्क मागण्यासाठी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. धरणे आंदोलन करूनही शासन-प्रशासन बीडीएस चालू करून तात्काळ आश्रमशाळेस अनुदान आदा न केल्यास बेमुदत आमरण उपोषण असे तीव्र आंदोलन करावे लागेल असे आश्रमशाळा संस्थाचालक यांनी सांगितले. या आंदोलनामध्ये सातारा जिल्ह्यातील आश्रमशाळा संस्थाचालक श्री मधूसुदन मोहिते-पाटील, श्री भाई माने, श्री पवन सुर्यवंशी, श्री कुंदन चव्हाण, श्री शिवाजीराव महानवर, श्री मारुती शिंदे, श्री महादेव नाळे, श्री संतोष नाळे व श्री रणजितसिंह देशमुख हे सर्व संस्थाचालक सहभागी झाले होते.
सातारा
प्रतिनिधी - उमेश चव्हाण
________
Also see : मुरबाड टोकावडे परिसरात पुन्हा एकदा बिबट्याची दहशत !
https://www.theganimikava.com/Leopard-terror-once-again-in-Murbad-Tokawde-area