मुख्य सचिव यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहिम जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहचविनार...

माझे कुटुंब माझी जबाबदारी' या योजनेचा शुभारंभ महाराष्ट्रात झाला असून ही योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्यासाठी जनजागृती करण्यात यावी असे असे आवाहन मुख्य सचिव यांनी आज व्हि सी द्वारे केले आहे...

मुख्य सचिव यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहिम जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहचविनार...
As per the guidelines of the Chief Secretary my family my responsibility is to make the campaign reach as many people as possible.

मुख्य सचिव यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहिम जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहचविनार - जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ

   

  पालघर (palghar) : 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या योजनेचा शुभारंभ महाराष्ट्रात झाला असून ही योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्यासाठी जनजागृती करण्यात यावी असे असे आवाहन मुख्य सचिव यांनी आज व्हि सी द्वारे केले आहे. या आवाहना ला जनतेनी मोठया प्रमाणात प्रतिसाद देऊन  योजना जास्तीत जास्त जनतेपर्यन्त पोहचविन्या येणार, असे जिल्हाधिकारी एस. गुरसळ यांनी सांगितले.

पालघर जिल्ह्यात देखील या मोहिमेचा शुभारंभ झाला आहे. दोन टप्प्यात हा उपक्रम राबविला जाणार असून जिल्ह्यातील चार लाख ९५,०००कुटुंबीयांची तपासणी करण्यात येणार आहे ७४० पथकांकडून कुटुंब सदस्यांची माहिती संकलित केली जाणार आहे.

'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या योजनेची यशस्वीरित्या अंमलबजावणी व्हावी याकरिता मुख्य सचिव संजय कुमार यांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही योजना पोहोचण्यासाठी आज व्हीसी द्वारे मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्यानुसार दिलेल्या सूचनांप्रमाणे ही मोहीम पालघर जिल्ह्यात राबविण्याकरिता जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसाळ यांनी योजना जिल्ह्यातील तळागाळातील लोकांपर्यंत पोचवण्याचे आव्हान प्रशासनामार्फत केले आहे.

 पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. के. सालीमठ यांनी जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांपर्यंत योजना पोहोचावी व या योजनेची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी सध्या सुरू असलेल्या ऑनलाईन शाळांमधून सर्व शाळांनी 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या विषयावर तासिका घेऊन विद्यार्थ्यांना शिक्षकांनी मार्गदर्शन करावे अशी सुचना केली आहे.

सफाळे , पालघर 
प्रतिनिधी - रविंद्र घरत 

_________

Also see : ऐस क्लासेसचा... हिल्याच वर्षी दणदणीत निकाल. 

https://www.theganimikava.com/Ace-classes-sounded-the-first-year