राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या कल्याण पश्चिम शहर अध्यक्षपदी योगेश माळी यांची नियुक्ती

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या कल्याण पश्चिम शहर अध्यक्षपदी योगेश माळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे...

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या कल्याण पश्चिम शहर अध्यक्षपदी योगेश माळी यांची नियुक्ती
Appointment of Yogesh Mali as NCP West City President of NCP Youth Congress

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या कल्याण पश्चिम शहर अध्यक्षपदी योगेश माळी यांची नियुक्ती


कल्याण (Kalyan) : राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या कल्याण पश्चिम शहर अध्यक्षपदी योगेश माळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सुभाष पिसाळ यांच्या शिफारशीनुसार राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील यांच्या हस्ते राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कल्याण पश्चिम शहर अध्यक्ष पदी योगेश माळी यांना नियुक्ती पत्र देऊन नियुक्ती करण्यात आली.  योगेश माळी यांनी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा कोंकण विभाग संपर्क प्रमुख किरण शिखरे व कल्याण विधानसभा अध्यक्ष अक्षय भास्कर यांची सदिच्छा भेट घेतली.  पुढील वाटचाली संदर्भात दोघांनीही पक्ष संघटना वाढीसंदर्भात माहिती देत शुभेच्छा दिल्या व प्रत्येक वेळी सहकार्य करण्याचे जाहीर केले.

आपल्या देशात युवाकांची संख्या मोठी असून, या देशात इतिहास घडविण्याची ताकद युवकांमध्ये आहे. युवकांच्या अनेक समस्या देखील असून आगामी काळात युवकांचे प्रश्न सोडविण्यासाठी, त्यांना न्याय  देण्यासाठी आणि संघटना वाढीसाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे नवनिर्वाचित कल्याण पश्चिम अध्यक्ष योगेश माळी यांनी सांगतिले.

कल्याण, ठाणे
प्रतिनिधी - कुणाल म्हात्रे 

________

Also see : मा. बहूजन समाज पार्टीचे संस्थापक नेते मा . कांशीरामजी साहेब यांची बीड मध्ये जयंती साजरी केली....

https://www.theganimikava.com/The-founding-leader-of-Bahujan-Samaj-Party-Hon-Kanshiramji-Saheb-birthday-was-celebrated-in-Beed