नवनाथ ढवळे यांची शहापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारीपदी नेमणूक

 दिलीप सावंत यांच्या विवादास्पद प्रकरणानंतर गणेशपूरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप गोडबोले यांच्याकडे होता शहापूरचा प्रभार...

नवनाथ ढवळे यांची शहापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारीपदी नेमणूक
Appointment of Navnath Dhawale as Sub-Divisional Police Officer, Shahapur

नवनाथ ढवळे यांची शहापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारीपदी नेमणूक

 दिलीप सावंत यांच्या विवादास्पद प्रकरणानंतर गणेशपूरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप गोडबोले यांच्याकडे होता शहापूरचा प्रभार

नवनाथ ढवळे यांची शहापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारीपदी नेमणूक

उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे यांची ठाणे ग्रामीण मधील शहापूर उपविभागीय अधिकारी म्हणून नेमणूक झाली आहे. ते याधी चिपळूण येथे कर्तव्य बजावत होते. तेथे सुरुवातीपासूनच नवनाथ ढवळे यांनी गुन्हेगारी, चोऱ्यांची प्रकरणे उघडकीस आणण्यात यश मिळवले होते. कोरोना काळातील लॉकडाऊनची परिस्थितीही त्यांनी यशस्वीपणे हाताळली होती.  
                          शहापूर उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून बदली झाल्यानंतर घरफोड्या, चेन स्नॅचिंग, संघटीत गुन्हेगारी, जातीय तेढ भावनेचे गुन्हे, महिला अत्याचाराच्या गुन्हे घटना, जुगार, मटका, बेकायदा प्रवासी वाहतूक आणि या सारख्या अवैध धंद्यांना आळा घालण्याचे आव्हान त्यांच्यापुढे असणार आहे. मागील काही वर्षांत सुस्तावलेल्या शहापूर हद्यीतील पोलीस ठाण्यांमध्ये कामकाजाची सुसूत्रता आणण्याचे देखील आव्हान त्यांना पेलावे लागणार आहे. महाराष्ट्रात उपविभागीय पोलीस अधिकारी, सहाय्यक पोलीस उपआयुक्त असलेल्या १०५ अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यामध्ये चिपळूण येथे कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे यांचा समावेश असून त्यांची शहापूर उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून नेमणूक झाली आहे. 
                       शहापूरचे याआधीचे उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप सावंत यांच्याविरोधातील विवादास्पद आरोपांनंतर गणेशपूरीचे पोलीस उपविभागीय अधिकारी दिलीप गोडबोले यांच्याकडे शहापूरचा प्रभार सोपविण्यात आला होता.

शहापूर  

प्रतिनिधी - शेखर पवार

_________

Also see : राधा मोहन साथी प्रतिष्ठानच्या वतीने पत्रकार सुकेशनी नाईकवाडे यांचा कोरोना योद्धा म्हणून गौरव...

https://www.theganimikava.com/Journalist-Sukeshni-Naikwade-honored-as-Corona-Warrior-on-behalf-of-Radha-Mohan-Saathi-Pratishthan