लोक हिंद गौरव २०२० पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन: महेश धानके 

लोक हिंद गौरव २०२० पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन महेश धानके यांना देण्यात आले....

लोक हिंद गौरव २०२० पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन: महेश धानके 
Appeal to send proposal for Lok Hind Gaurav 2020 award: Mahesh Dhanke

लोक हिंद गौरव २०२० पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन: महेश धानके 

   ठाणे जिल्हा ग्रामीण पत्रकार संघाच्या वर्धापनदिन निमित्त लोक हिंद वृत्तवाहिनी आणि साप्ताहिक शिवमार्ग तर्फे दरवर्षी राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्यांना लोक हिंद गौरव हा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन विविध मान्यवरांच्या हस्ते एका दिमाखदार कार्यक्रमात गौरविण्यात येते. यंदाचे तिसरे वर्ष असून कोरोना संक्रमण असल्याने हा कार्यक्रम जून,जुलै ऐवजी  डिसेंबर मध्ये हा कार्यक्रम होणार असून राज्यात सामाजिक,शैक्षणिक, राजकीय,सांस्कृतिक, उद्योग,आरोग्य,कामगार, प्रशासकीय सेवा,सहकार,आध्यत्मिक सह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व त्यांच्या प्रतिनिधी कडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. मानपत्र,सन्मानचिन्ह, तुकाराम गाथा, शाल,श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप असून  दि 30 ऑक्टोबर 2020 पर्यत आपले प्रस्ताव लोक हिंद चॅनेल, देशमुख वाडा,महाराष्ट्र बँकेच्या समोर,शहापुर, जिल्हा ठाणे.मोबाईल,9689995000 / 9833335090 येथे पोस्टाने,कुरियरने अथवा प्रत्यक्ष पाठवावे असे आवाहन पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश धानके,उपाध्यक्ष लक्ष्मण घरत , शहापुर तालुका अध्यक्ष जितेंद्र भानुशाली,भिवंडी तालुका अध्यक्ष जगदीश पताळे, अंकुश भोईर यांनी केले आहे.

मुरबाड

प्रतिनिधी - लक्ष्मण पवार

________

Also see :पालघर जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी बदली होऊन ही कार्यमुक्त न झाल्याने वादाच्या भोवऱ्यात

https://www.theganimikava.com/The-Deputy-Chief-Executive-Officer-of-Palghar-Zilla-Parishad-has-been-transferred-and-he-has-not-been-relieved-of-his-duties