भाजपा महीला आघाडी तालुका अध्यक्षपदी अंकिता दुबेले यांची निवड
भाजपच्या विविध आघाड्यांची कार्यकारिणी जाहीर....

भाजपा महीला आघाडी तालुका अध्यक्षपदी अंकिता दुबेले यांची निवड
भाजपच्या विविध आघाड्यांची कार्यकारिणी जाहीर..
वाडा : भारतीय जनता पार्टीच्या निष्ठावंत व सक्रिय कार्यकर्त्या अंकिता दुबेले यांची भाजपा (bjp) महीला आघाडीच्या वाडा तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे . यावेळी विविध आघाड्यांची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 70 व्या वाढदिवस हा भाजपतर्फे राष्ट्रीय पातळीवर 14 ते20 सप्टेंबर पर्यंत सेवा सप्ताह म्हणून साजरा करण्यात येत आहे.या निमित्ताने वाडा तालुक्यात भाजपचे (bjp) ज्येष्ठ नेते व ठाणे ग्रामीण जिल्ह्याचे प्रभारी बाबाजी काठोळे व जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील यांच्या नेतृत्वाखालील विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याच अनुषंगाने प्लाझमा दान शिबीराचे आयोजन वाडा येथील जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात करण्यात आले होते. यावेळी कोरोनाच्या (corona) पार्श्वभूमीवर विषेश मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मोजक्याच कार्यकर्त्यांच्या बैठकीत या विविध आघाड्यांची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या बैठकीत सामाजिक अंतराचे पालन केल्याचे दिसून आले.
अंकिता दुबेले या माजी पं.स वाडा सदस्या असुन त्यांनी महीला आघाडीच्या जिल्हा चिटणीस, तालुका उपाध्यक्ष, तालुका खजिनदार अशी विविध पदे भूषविली आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत ही निवड करण्यात आली आहे.
कार्यकारणी :--
तालूका सरचिटणीस - रोहन पाटील, राजेश रिकामे,चिटणीस नितीन घरत, कोषाध्यक्ष पंढरीनाथ घोडविदे,
महीला आघाडी--अंकिता दुबेले
युवा मोर्चा-- मोनिष पाटील
कृषी आघाडी--भालचंद्र कासार
ओबीसी आघाडी - कांतीलाल गोरे
दलित आघाडी- नितिन जाधव
अल्पसंख्याक आघाडी- खलील मुल्ला
कामगार आघाडी- भरत जाधव
कायदा आघाडी- जितेंद्र गायकवाड
शिक्षक प्रकोष्ठ आघाडी-जनार्दन भोईर आदी नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.
यावेळी भाजपचे जेष्ठ नेते व ठाणे ग्रामीण जिल्ह्याचे प्रभारी बाबाजी काठोळे, जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील,संघटन सरचिटणीस संतोष जनाठे, उपाध्यक्ष संदीप पवार, तालुकाध्यक्ष मंगेश पाटील, जेष्ठ नेत्या शुभांगी उत्तेकर, समीर पाटील, मनिष देहेरकर, रोहन पाटील, ॲड. संतोष डेंगाणे, कुणाल साळवी, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत ही कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
वाडा
प्रतिनिधी - जयेश घोडविंदे
__________
Also see : मराठा समाजाला न्याय देण्याची रणरागिणी प्रतिष्ठानची मागणी
https://www.theganimikava.com/Ranaragini-Pratishthan-demands-justice-for-the-Maratha-community