रुग्ण दाखल न केल्याने संतप्त नागरिकांनी केली रुग्णालयाची तोडफोड

पोलिसानी मारहाण व तोडफोड करणार्यांना गुन्हे दाखल करीत केली अटक.......

रुग्ण दाखल न केल्याने संतप्त नागरिकांनी केली रुग्णालयाची तोडफोड


कल्याणातील आयुष  हॉस्पिटलची तोडफोड

पोलिसानी मारहाण व तोडफोड करणार्यांना गुन्हे दाखल करीत केली अटक

कल्याण (kalyan) :  रुग्ण दाखल न केल्याने रुग्णाला दुसरया रुग्णालयात नेईपर्यत रुग्णाचा जीव गेल्याच्या रागातून काही नागरिकांनी कल्याण (kalyan) पश्चिमेतील आयुष रुग्णालयाची तोडफोड करत डॉक्टर आणि कर्मचार्यांना शिवीगाळ आणि मारहाण केल्याची घटना रविवारी घडली आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलिसांनी प्रतीक, प्रितेश, प्रकाश आंबेकर व अन्य दहा नागरिकांना वर गुन्हे दाखल केला आहे.

कल्याण पश्चिमेकडील खडकपाडा परिसरातील आयुष हॉस्पिटल हे कोव्हीडसाठी (covid) राखीव असताना या रुग्णालयात (hospital) एका रुग्णाला उपचारासाठी दाखल न केल्याने उपचाराअभावी रुग्ण मृत्यू पावल्याचा आरोप  संतप्त नातेवाइकांनी केला.मयत रुग्णाच्या (patient) नातेवाईकांसह अन्य नागरिकांनी हॉस्पिटल प्रशासनाला याबाबत जाब विचारीत डॉक्टर व कर्मचारयांना शिवीगाळ करित हॉस्पिटल मधील वस्तूची तोडफोड केली. तसेच रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी ऑक्सिजन  घेऊन आलेल्या ऑक्सिजन व्हॅनच्या चालकाला ही मारहाण केली. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात हॉस्पिटलची तोडाफोड, व मारहाण करणाऱ्यां प्रतीक, प्रितेश, प्रकाश आंबेकर व अन्य नऊ ते दहा आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

कल्याण, ठाणे
प्रतिनिधी - कुणाल म्हात्रे

_________

Also see : पाटण मतदार संघात उभारले कोरोना केअर सेंटर जनतेच्या हितासाठी सदैव तत्पर - राज्यमंत्री शंभूराजे देसाई...

https://www.theganimikava.com/Corona-Care-Center-always-ready-for-the-benefit-of-the-people---Minister-of-State-Shambhuraje-Desai