अल्पवयीन मुलाने केली 18वर्षीय मित्राची चाकू  भोसकून हत्या

किरकोळ वादातून एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलाने आपल्या 18 वर्षीय मित्राची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना अंबरनाथ रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या पूर्वेकडील बी कॅबिन परीसरात घडली आहे.

अल्पवयीन मुलाने केली 18वर्षीय मित्राची चाकू  भोसकून  हत्या
An 18-year-old friend was stabbed to death by a minor

अल्पवयीन मुलाने केली 18वर्षीय मित्राची चाकू  भोसकून केली हत्या

  ठाणे (Thane) : किरकोळ वादातून एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलाने आपल्या 18 वर्षीय मित्राची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना अंबरनाथ रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या पूर्वेकडील बी कॅबिन परीसरात घडली आहे. याप्रकरणी अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी विधीग्रस्त मुलास ताब्यात घेतले आहे. अमन शेख (वय 18 वर्षे), असे चाकूने भोसकून हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, अल्पवयीन आरोपी व मृत अमन हे दोघे अंबरनाथ रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या झोपडपट्टीत शेजारी राहतात. शुक्रवारी (दि. 9 ऑक्टोबर) रात्रीच्या सुमारास अल्पवयीन आरोपी, मृत अमन व आणखी एक मित्र असे तिघे अंबरनाथ रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या पूर्वेकडील बी कॅबिन परीसरात दारू पीत बसले होते. त्यावेळी अमनने अल्पवयीन आरोपीला घरी जाण्यास सांगतच दोघांमध्ये वाद झाला. हा एवढा विकोपाला गेला की, त्या अल्पवयीन आरोपीकडे असलेला धारदार चाकू त्याने अमनच्या पोटात भोसकला. अमनच्या पोटात चाकू भोसकून अल्पवयीन आरोपीने पळ काढला. त्यांनतर अमनजवळ असलेल्या त्याच्या मित्राने काही नागरिकांच्या मदतीने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे शासकीय रुग्णालयातील डॉक्टरने घोषित केले.माहिती देताना वरिष्ठ पोलीस निरीक्षकदरम्यान, आरोपी व मृतामध्ये दोन दिवसांपूर्वीही किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. मात्र, शुक्रवारी रात्रीच्या सुमाराला दोघे पुन्हा एकत्र येत दारूची पार्टी करायला बसले. त्यामुळे यातील एका मित्राला किरकोळ वादातून जीव गमवावा लागल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनजीतसिंग बग्गा यांनी सांगितले.

भिवंडी, ठाणे 
प्रतिनिधी - सत्यवान तरे 

_________

Also see : गोहत्या, गोतस्करी, तसेच अवैध पशुवधगृहांवर प्रतिबंध कधी लागणार ? - श्री. संजय शर्मा, श्रीशिवछत्रपती गोरक्षा जनआंदोलन

https://www.theganimikava.com/What-is-the-system-on-cow-slaughter-Gotaskari-as-well-as-illegal-slaughterhouses-Mr-Sanjay-Sharma-Srishivatrapati-Goraksha-Jan-Andolan