आमदार किसन कथोरे यांच्य विकास निधीतून मुरबाड ग्रामीण रुग्णालयाला ॲम्बुलन्स भेट 

मुरबाड हे भविष्यात  जगाच्या नकाशावर असणार आमदार किसन कथोरे ......

आमदार किसन कथोरे यांच्य विकास निधीतून मुरबाड ग्रामीण रुग्णालयाला ॲम्बुलन्स भेट 
Ambulance to Murbad Rural Hospital from Development Fund of MLA Kisan Kathore

आमदार किसन कथोरे यांच्या विकास निधीतून मुरबाड ग्रामीण रुग्णालयाला ॲम्बुलन्सभेट 
 

मुरबाड हे भविष्यात  जगाच्या नकाशावर असणार आमदार किसन कथोरे 


 मुरबाड तालुक्यात वाढता कोरोना (corona) विषाणूचा प्रादुर्भाव पाहता मुरबाड तालुक्याचे आमदार किसनजी कथोरे यांच्या आमदार विकास निधीतून ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने मुरबाड ग्रामीण रुग्णालयाला (murbad rural hospital) सुसज्ज अशा ॲम्बुलन्सचे नुकताच आमदार कथोरे यांच्या हस्ते लोकार्पण करून तालुका ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली.

या उद्घाटन प्रसंगी मुरबाड नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष छायाताई चौधरी, जिल्हा परिषद सदस्य उल्हास भाऊ बांगर, नगरसेवक रवी देसले, पंचायत समिती सभापती श्रीकांत धुमाळ, उपनगराध्यक्षा अर्चना विशे, माजी नगराध्यक्ष किसन अनंत कथोरे, माजी नगराध्यक्षा शीतल तोंडलीकर, मोहन सासे, मुरबाड तालुका भाजप अध्यक्ष जयवंत सूर्यराव, शहराध्यक्ष सुधीर भाई तेलवणे, माजी उपनगराध्यक्ष नारायण गोंधळी, मुरबाड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोराटे, भाजप ठाणे जिल्हा सरचिटणीस नितीन मोहपे व ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर्स व कर्मचारी उपस्थित होते. तसेच मराठी पत्रकार संघाचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष पत्रकार शंकर करडे, पत्रकार दिलीप पवार, पत्रकार लक्ष्मण पवार, पत्रकार संतोष गायकर व शहरातील नागरिक उपस्थित होते.

भविष्यात मुरबाड  तालुका हा विकासाच्या बाबतीत जगाच्या नकाशावर दिसणार - आमदार किसन कथोरे

मुरबाड

प्रतिनिधी - लक्ष्मण पवार  

_______

Also see : कोविड करिता रुग्णवाहिका लोकार्पण....

https://www.theganimikava.com/Dedication-of-ambulance-to-Kovid