प्रभागाच्या विकासासाठी सदैव तत्पर !! सेवायज्ञतेवतअखंडनिरंतर !!

प्रभागातील चिंचवडे नगर परिसरातील धोकादायक ट्रान्सफॉर्मरचे होणार क्षमता वाढी सह स्थलांतर

प्रभागाच्या विकासासाठी सदैव तत्पर !! सेवायज्ञतेवतअखंडनिरंतर !!
Always ready for the development of the ward Continuity of service

प्रभागाच्या विकासासाठी सदैव तत्पर !!
सेवा यज्ञतेवत अखंड निरंतर !!

प्रभागातील चिंचवडे नगर परिसरातील धोकादायक ट्रान्सफॉर्मरचे होणार क्षमता वाढीसह स्थलांतर !!
 

चिंचवडे नगर परिसरातील गुरुमैय्या शाळेजवळ महावितरणचा संपूर्ण चिंचवडेनगर ला वीजपुरवठा करणारा ट्रान्सफॉर्मर आहे, सदरील ट्रान्सफॉर्मर अतिशय जुना असून त्या ट्रान्सफॉर्मर वरील लोड वाढला असल्याने चिंचवडे नगर परिसरात वारंवार खंडित वीजपुरवठ्याला सामोरे जावे लागते, तसेच शाळेच्या प्रवेशद्वार व आवारालाच सदरचा धोकादायक ट्रान्सफॉर्मर असून गुरुमैय्या शाळेच्या आवारात परिसरातील लहान लहान मुले शिकत असून त्या ठिकाणी जास्त संख्येने खेळत असतात, बागडत असतात त्यामुळे त्या ठिकाणी दुर्घटना होण्याची शक्यता वाटते त्या साठी आज महावितरणच्या चिंचवड सब वे व बिजलीनगर उपकेंद्र मधील अभियंता यांना भेटून समस्या सांगितली ,हा ट्रान्सफॉर्मर लवकरात लवकर स्थलांतरीत करावा व त्यावर वीजपुरवठा असणाऱ्या चिंचवडे नगर परिसरासाठी त्याची क्षमता वाढवावी यासाठी आज लेखी पत्र दिले, महावितरणच्या अधिकाऱ्यांनी देखील हे मान्य केले असून तातडीची बाब म्ह्णून डिव्हिजनला लगेचच याबाबत पत्रव्यवहार केला असून लवकरच त्या ठिकाणहून तो स्थलांतरित केला जाणार आहे 

प्रभागाच्या सुरक्षित सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील !!

आपलीच ताई :- 
नगरसेविका सौ. करुणा शेखर चिंचवडे अध्यक्षा - ब प्रभाग समिती 
पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी चिंचवड

प्रतिनिधी  - संस्कृती गोडसे 

_________

Also see : पिंपरी  चिंचवड मध्ये कोरोना संख्याची वाढ

https://www.theganimikava.com/Increase-in-the-number-of-corona-in-Pimpri-Chinchwad