सफाळे येथे जाणारा पर्यायी रस्ता तातडीने दुरुस्त करवा -आ.श्रीनिवास वनगा
पालघर-सफाळे राज्यमार्गाला जोडणारा महत्वाचा माकुणसार खाडीवरील पुल नादुरुस्त झाल्याने नवीन पुलाचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून होत आहे...

सफाळे येथे जाणारा पर्यायी रस्ता तातडीने दुरुस्त करवा -आ.श्रीनिवास वनगा
पालघर-सफाळे राज्यमार्गाला जोडणारा महत्वाचा माकुणसार खाडीवरील पुल नादुरुस्त झाल्याने नवीन पुलाचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळं सफाळे व पालघर कडे येणारी सर्व वाहतूक पर्यायी मार्ग म्हणून कापसे-केळवारोड आणि तिघरे-दांडाखाडी-केळवे गाव अशी वळवण्यात आली आहे. या महत्त्वाच्या रस्त्यावरून जड-अवजड वाहतूक रोज होत असल्यामुळे हे दोन्ही पर्यायी रस्ते सतत कोसळत असलेल्या पावसामुळे खूपच खराब झाले आहेत. रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले असून एकावेळी एकच वाहन ये-जा करू शकते. त्यामुळे छोटे/मोठे अपघात घडण्याची श्यक्यता नाकारता येऊ शकत नाही. यासंदर्भात अनेक ग्रामस्थांनी पालघर विधानसभा आ. श्रीनिवास वनगा यांच्याकडे तक्रार केली होती.
आमदार वनगा यांनी तक्रारीची दखल घेऊन केळवे-तिघारे पर्यायी रस्ता व पालघर मतदारसंघा मधील इतर ठिकाणचे नादुरुस्त रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी वर्गाला निर्देश दिले. उमरोळी-सरावली रस्ता, बोईसर-तारापूर रस्ता, चिंचणी, वाणगाव अश्या प्रमुख रस्त्याबाबत पण चर्चा केली व तातडीने दुरुस्तीचे निर्देश दिले. पालघर शासकीय निवासस्थानी आयोजित केलेल्या बैठकीत यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग पालघरचे उपअभियंता एम.पी.किणी, शाखाभियंता चौधरी, डहाणू विभाग शाखा अभियंता गायकवाड आदी उपस्थित होते.
पालघर
प्रतिनिधी - राजेंद्र पाटील
__________
Also see : ६० कलाकार, तंत्रज्ञ, बॅक स्टेज आर्टिस्टना जीवनोपयोगी साहित्याचे वाटप