अखिल भारतीय ओबीसी महासभा ठाणे जिल्हा पदनियुक्ती कार्यक्रम संपन्न 

सामाजिक कार्यकर्ते व सामाजिक बांधिलकी जपणारे, समाजाच्या विकासासाठी धडपड करणारे डोंबिवली येथिल समाजसेवक जयवंत पाटील यांची नियुक्ती ठाणे जिल्हा सचिव पदावर करण्यात आली आहे.

अखिल भारतीय ओबीसी महासभा ठाणे जिल्हा पदनियुक्ती कार्यक्रम संपन्न 
All India OBC Mahasabha Thane District Appointment Program Concluded

अखिल भारतीय ओबीसी महासभा ठाणे जिल्हा पदनियुक्ती कार्यक्रम संपन्न 

अखिल भारतीय ओबीसी महासभा ठाणे जिल्हा शाखा अंतर्गत संपूर्ण जिल्ह्य़ात संघटना संपर्क व पदनियुक्ती अभियान राबविण्यात येत असून आज रविवार दिनांक 18 ऑक्टोबर रोजी प्रमुख मार्गदर्शक कोकण विभागीय अध्यक्ष मा. राजाराम ढोलम यांच्या उपस्थितीत पदनियुक्ती कार्यक्रम झाला, सामाजिक चळवळीतील 40 वर्षेचा अनुभव गाठीशी असलेले बहुजन समाजात नेतृत्वाचा चांगला अनुभव असणारे व सामाजिक जाणिव असलेले ठाण्यातील कोपरी येथे राहाणारे जेष्ठ पत्रकार आबासाहेब चासकर यांची अभाओबीसी महासभा ठाणे जिल्हा सल्लागार पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच सामाजिक कार्यकर्ते व सामाजिक बांधिलकी जपणारे, समाजाच्या विकासासाठी धडपड करणारे डोंबिवली येथिल समाजसेवक जयवंत पाटील यांची नियुक्ती ठाणे जिल्हा सचिव पदावर करण्यात आली आहे. ठाणे  कोलबाड येथिल जिल्हा संपर्क  कार्यालयात हा कार्यक्रम  आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचे आयोजक ओबीसी महासभा ठाणे जिल्हा अध्यक्ष धनाजी सुरोसे यावेळी संघटनेचे विचार मांडताना म्हणाले की, ओबीसी प्रवर्गातील 350 जातीं असलेल्या समाज बांधवाना एकत्र   एकाच छताखाली घेऊन शेवटच्या घटकात येणारा ओबीसी बांधवांना त्यांच्या हक्काची जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी संघटन वाढवणे हिच काळाची आहे, जातीमुळे निर्माण होणारी अलिप्तता दूर करुन ओबीसी सारे भाऊ भाऊ स्वउद्धारासाठी लढा देऊ हे धोरण स्विकारुन या राष्ट्रीय संघटनेला जोडण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असे आवाहन केले. यावेळी मा. चंद्रकांत नेवरेकर, मधूकर मोरे, प्रकाश कदम, संतोष पाईकराव, आदी उपस्थित होते.

मुरबाड

  प्रतिनिधी - लक्ष्मण पवार  

__________

Also see : बँक ऑफ बडोदातर्फे किसान पंधरवडा उत्साहाने साजरा

https://www.theganimikava.com/Bank-of-Baroda-celebrates-Kisan-Pandharwada-with-enthusiasm