भाजप पुणे अल्पसंख्य आघाडीच्या प्रभारीपदी अली दारूवाला
भारतीय जनता पक्षाच्या पुणे शहर अल्पसंख्य आघाडीच्या प्रभारी पदी अली दारूवाला यांची नियुक्ती करण्यात आली आहे...
भाजप पुणे अल्पसंख्य आघाडीच्या प्रभारीपदी अली दारूवाला
पुणे : भारतीय जनता पक्षाच्या पुणे शहर अल्पसंख्य आघाडीच्या प्रभारी पदी अली दारूवाला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे (bjp) पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दारूवाला यांना ३० सप्टेबर रोजी नियुक्तीपत्र दिले. अली दारूवाला हे मुस्लीम राष्ट्रीय मंचाचेही पदाधिकारी आहेत. अल्पसंख्य समाजात भारतीय जनता पक्षाचे संघटन वाढविण्यासाठी कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जगदीश मुळीक,राजेश पांडे,लतीफ मगदूम यांनी त्यांचे अभिनंदन केले.
पुणे
प्रतिनिधी - अशोक तिडके
_________
Also see : पोलीस आणि सफाई कामगारांना स्टीमरचे वितरण
https://www.theganimikava.com/Distribution-of-steamers-to-police-and-cleaners