अखिल भारतीय किसान सभा

शिरढोण तालुका कवठेमहांकाळ येथे  बाधित शेतकर्‍यांच्या फेर सर्वे च्या निवाडा नोटीस तातडीने द्या या साठी गेली दीड वर्षे झाली संघर्ष सुरू आहे.

अखिल भारतीय किसान सभा
Akhil Bharatiya Kisan Sabha

अखिल भारतीय किसान सभा
   

रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 बाधीत शेतकर्‍यांच्या बाधीत क्षेत्रात झालेल्या पुनः सर्वे च्या निवाडा नोटीस न देताच बाधीत क्षेत्रातील शेतकर्‍यांच्या घरांना दुकानाला जे सि बी  लावून पाडण्याचा प्रशासनाचा डाव किसान सभेने
 हाणून पाडला.

शिरढोण तालुका कवठेमहांकाळ येथे  बाधित शेतकर्‍यांच्या फेर सर्वे च्या निवाडा नोटीस तातडीने द्या या साठी गेली दीड वर्षे झाली संघर्ष सुरू आहे. त्या संबंधी वारंवार मा. प्रांताधिकारी साहेब मिरज यांना निवेदन देण्यात आले आहे तरी ही अध्याप निवाडा नोटीस न मिळाल्यामुळे 1 ऑक्टोबर रोजी निवेदन देऊन 15 ऑक्टोबर पूर्वी फेर सर्वे च्या निवाडा नोटीस नाही मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता... निवाडा नोटीस देणेचे सोडून शनिवारी दुपारी शेतकर्‍यांच्या बाधीत क्षेत्रात झालेल्या पुनः सर्वे ठिकाणी जबरदस्तीने बांधकामे पाडण्याचा प्रयत्न करत असताना किसान सभेच्या वतीने सर्व शेतकऱ्यांनी विरोध केला. नॅशनल हायवे च्या अधिकार्‍यांनी कॉम्रेड दिगंबर कांबळे यांना ताब्यात घ्या असे पोलिसांना सांगताच सर्व शेतकरी आम्हा सर्वांना ताब्यात घ्या म्हणताच सर्व अधिकारी दिलीप बिल्डकॉन कंपनी च्या कर्मचाऱ्यांनी तिथून पळ काढला. व 15 तारखेला सुरू होणारे आंदोलन शनिवारी दुपारी सुरू करण्यात आले.
   महामार्ग बाधित शेतकर्‍यांच्या प्रश्नावर.....

       बेमुदत ठिय्या आंदोलन

ठिकाण. शिरढोण. तालुका कवठेमहांकाळ येथे बस स्टँड शेजारी. किसान सभेच्या बोर्डाजवळ.. 

तरी तालुक्यातील बाधित सर्व शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन आम्ही करीत आहोत. 
   
     मागण्या

फेर सर्वे च्या निवाडा नोटीस तातडीने द्या. मगच बाधित क्षेत्रात काम सुरू करा. 

कागद पत्रे जमा असणार्‍या 3d सहित सर्व बाधीत शेतकर्‍यांना तातडीने नुकसान भरपाई द्या. 

बाधित शेतकर्‍यांचे चुकून राहिलेले सर्व नव्याने बाधित होत असलेले सर्व फेर सर्वे पूर्ण करा. त्या ही सर्व शेतकऱ्यांना निवाडा नोटीस तातडीने द्या. 

कॉम्रेड उमेश देशमुख. 
कॉम्रेड दिगंबर कांबळे. 

शेतकरी एकजुटी चा विजय असो. किसान सभा जिंदाबाद

सांगली

प्रतिनिधी  - जगन्नाथ सकट

__________

Also see : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आठही प्रभाग अध्यक्षांची बिनविरोध निवड..

https://www.theganimikava.com/Unopposed-election-of-all-eight-ward-presidents-of-Pimpri-Chinchwad-Municipal-Corporation