कितीही संकट येवोत, महाराष्ट्र कधीही झुकला नाही

सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांशी संवाद साधतना अजित पवार बोलत होते.

कितीही संकट येवोत, महाराष्ट्र कधीही झुकला नाही
Ajit Pawar news

कितीही संकट येवोत, महाराष्ट्र कधीही झुकला नाही

सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांशी संवाद साधतना अजित पवार बोलत होते.

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं. आपलं सरकार स्थिरस्थावर होत नाही तोच कोरोनाचं संकट आलं. मधल्या काळात राज्यात दोन वादळं येऊन गेली. या संकटाचा आघाडी सरकारने सामना केला, असं सांगतानाच कितीही संकट येवोत, आव्हान येवोत महाराष्ट्र कधी झुकला नाही आणि झुकणार नाही.(ncp leader ajit pawar address NCP foundation day)

राष्ट्रवादी काँग्रेसचा आज 22 वा वर्धापन दिन आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांशी संवाद साधतना अजित पवार बोलत होते. राज्यात आघाडीचं सरकार आल्यानंतर नैसर्गिक संकटं आली. या संकटाचा आपण सामना केला. यापुढेही आपल्याला आव्हानाचं रुपांतर संधीत करावं लागणार आहे. महाविकास आघाडी सरकारने लोककल्याणाची कामं केली आहेत.


केंद्रात भाजपचं सरकार आहे. या सरकारने देशातील एकता आणि आखंडतेला धक्का देण्याचं काम सुरू केलं आहे. लोकशाही संस्था मोडीत काढण्याचं काम सुरू केलं आहे. पत्रकारांपासून अनेक घटकांची मुस्कटदाबी सुरू आहे. लोकशाहीला झुंडशाहीचं स्वरुप देण्याचं काम सुरू आहे. संविधान वाचवण्याचं आव्हान उभं राहिलं आहे. 

 महाराष्ट्राच्या विकासावरही त्याचा परिणा झाला आहे, असं ते म्हणाले. भाजपचं केंद्रात सरकार आल्यापासून देशात महागाई वाढली आहे. पेट्रोल-डिझेलपासून ते स्वयंपाकाचा गॅसही महागला आहे, असं त्यांनी सांगितलं. कोरोनाच्या संकटात महाविकास आघाडीने लोकांना प्रचंड मदत केली. बेड, औषधे, अन्यधान्य आणि इतर शक्य ती मदत देण्याचं काम आपण केलं आहे.(ncp leader ajit pawar address NCP foundation day)

कोरोनाचं संकट दूर होईपर्यंत आपल्याला ही मदत करावी लागणार आहे.