सातारा पोलिस अधीक्षकपदी अजयकुमार बन्सल यांची नेमणूक

सातारा पोलिस अधीक्षकपदी कार्यरत असणाऱ्या तेजस्वी सातपुते यांची सोलापूर ग्रामीण येथे बुधवारी बदली करण्यात आली...

सातारा पोलिस अधीक्षकपदी अजयकुमार बन्सल यांची नेमणूक
Ajay Kumar Bansal appointed as Satara Superintendent of Police

सातारा पोलिस अधीक्षकपदी अजयकुमार बन्सल यांची नेमणूक

 

सातारा : सातारा पोलिस अधीक्षकपदी कार्यरत असणाऱ्या तेजस्वी सातपुते यांची सोलापूर ग्रामीण येथे बुधवारी बदली करण्यात आली. याबाबतचे आदेश गृहविभागाचे उपसचिव कैलास गायकवाड यांनी जाहीर केले आहेत.

सातारा पोलिस दलाच्या अधीक्षकपदाची सूत्रे सुमारे दिड वर्षांपूर्वी तेजस्वी सातपुते यांनी स्वीकारली होती. पदभार स्वीकारल्यानंतर तेजस्वी सातपुते यांनी पोलिस दलासह कर्मचाऱ्यांच्या सक्षमीकरणाचा आराखडा तयार केला. यानुसार त्यांनी सातारा पोलिस दलाचा नावलौकिक आणि अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावले. मीरा बोरवण्णकर यांच्यानंतर सातारा पोलिस दलाची सूत्रे स्वीकारणाऱ्या तेजस्वी सातपुते या दुसऱ्या महिला अधिकारी ठरल्या होत्या. अधीक्षकपदी कार्यरत असताना सातपुते यांनी उंब्रज आणि पाटण पोलिस ठाण्याचे विभाजन केले. सातपुते यांना अनेक युवतींच्या प्रेरणास्थान राहिल्या आहेत. सातारा जिल्हा मध्ये त्यांच्या कामाची चर्चा खेडो पाडी पोहचली आहे.तर आता सातारा जिल्हा पोलिस अधीक्षक पदी चंद्रपूर येथे कार्यरत असणारे अजयकुमार बंसल यांची नेमणूक केली आहे.

सातारा 
प्रतिनिधी - उमेश चव्हाण 

___________

Also see : ऊसतोड कामगारांना चोरट्या मार्गाने कारखानदारांनी घेऊन जाऊ नये अन्यथा आंदोलन तीव्र करणार - मोहन जाधव

https://www.theganimikava.com/Sugarcane-workers-should-not-be-smuggled-by-the-manufacturers-otherwise-the-agitation-will-intensify