पेट्रोल , जनरेटर, बॅटरी चोरी करणाऱ्या आरोपींना सफाळे पोलिसांनी केले गजाआड

सफाळे पोलिसांनी मोटारसायकल मधील पेट्रोल, जनरेटर, बॅटरी चोरी प्रकरणी दोघांना अटक करण्यात आले...

पेट्रोल , जनरेटर, बॅटरी चोरी करणाऱ्या आरोपींना सफाळे पोलिसांनी केले गजाआड
Accused of stealing petrol, generators and batteries were nabbed by the police

पेट्रोल , जनरेटर, बॅटरी चोरी करणाऱ्या आरोपींना सफाळे पोलिसांनी केले गजाआड


सफाळे पोलिसांनी मोटारसायकल मधील पेट्रोल, जनरेटर, बॅटरी चोरी प्रकरणी दोघांना अटक केली आहे. सदरच्या घटनेत   चोरीला गेलेला माल हस्तगत करण्यात आला.

सफाळे पुर्व भागातील नावझे नाक्यावर मोटारसायकल एम.एच.०४ डीयु ७८८३ या गाडीतून पेट्रोल चोरी करीत असताना नावझे येथील जितेंद्र रमेश  भोईर  यांच्या निर्देशनात आले. त्यांनी  आरोपींस  प्रतिश  रविंद्र राडऐ (१९ वर्ष) ठाकुरपाडा , सागर ऊर्फ डॉन यशवंत पाटील  (२२ वर्ष) जलसार यांना पकडून सफाळे पोलिसांना पाचारण करून ताब्यात दिले. सफाळे पोलिसांनी आरोपींना  गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली. सदर गुन्ह्यातील आरोपी सागर पाटील  यांच्या विरोधात केळवे पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे तपासात निष्पन्न झाले. सदरच्या कारवाईत सफाळे व कल्याण तालुका येथील चोरीला गेलेला माल शंभर टक्के हस्तगत करण्यात आला आहे. सदरच्या कारवाई पालघर उपविभागीय पोलिस अधिकारी विकास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सुनील जाधव, पो.ह. महेंद्र शर्मा, पो.ह.ए.न.बोरसे, पो.ना.विशाल विसावे,पो.ना.संदीप नांगरे, पो.ना.वैभव सातपुते, पो.काॅ. शिवपाल प्रधाने,पो.काॅ. मोकल यांनी केलेली आहे.

सफाळे पालघर 
प्रतिनिधी - रविंद्र घरत

_______

Also see : अतिधोकादायक इमारतीवर केडीएमसीची तोडक कारवाई  

https://www.theganimikava.com/KDMC-cracks-down-on-high-risk-building