आंबिस्ते गावातील तरुणावर वीज पडून मृत्यू
वाडा तालुक्यातील आंबिस्ते गावातील एका पाड्यावर अचानक वीज पडल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून ५ व्यक्ती जखमी झाले आहेत.

आंबिस्ते गावातील तरुणावर वीज पडून मृत्यू
वाडा तालुक्यातील आंबिस्ते गावातील एका पाड्यावर अचानक वीज पडल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून ५ व्यक्ती जखमी झाले आहेत.
वाडा तालुक्यात दिवसभर ढगाळ वातावरण होत. संध्याकाळी विजांच्या गडगटासह पाऊस सुरू होता. यावेळी संध्याकाळी ४ वाजण्याच्या सुमारास आंबिस्ते येथील एका पाड्यातील ६ जणांवर वीज पडली. यामध्ये सागर शांताराम दिवा (वय १७) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. संदिप अंकुश दिवा (वय २५) , अनंता चंद्रकांत वाघ (वय २४), रविंद्र माधव पवार (वय१८), नितेश मनोहर दिवा (वय १९), सनी बाळु पवार (वय १८) हे पाच जण जखमी झाले आहेत. जखमींना खानिवली येथील प्राथमिक आरोग्यकेंद्रात दाखल करण्यात आले असून त्यांची तब्येत ठीक आहे.
वाडा
प्रतिनिधी - जयेश घोडविंदे
______
Also see:कुपोषण नियंत्रणासाठी अभिनेत्री जॅकलीने पालघरमधील दोन गावे घेतली दत्तक | Actress Jacqueline adopted two villages in Palghar to control malnutrition