कळवण तालुक्यात भाजपाचे श्रीक्षेत्र सप्तशृंगी देवी निवासीनी येथे पहिल्या पायरीवर लाक्षणिक उपोषण.......!

भाजपाच्या वतीने गेल्या साडे सहा महिन्यापासून बंद असलेले मंदिरे, धार्मिक स्थळे, देवालये उघडावेत याकरिता सातत्याने मागणी करून देखील राज्यातील महाविकास आघाडी सरकारने कुठल्याही प्रकारची दखल किंवा निर्णय घेतला नाही...

कळवण तालुक्यात भाजपाचे श्रीक्षेत्र सप्तशृंगी देवी निवासीनी येथे पहिल्या पायरीवर लाक्षणिक उपोषण.......!
A symbolic fast on the first step at BJP's Shrikshetra Saptashrungi Devi Niwasini in Kalvan taluka
कळवण तालुक्यात भाजपाचे श्रीक्षेत्र सप्तशृंगी देवी निवासीनी येथे पहिल्या पायरीवर लाक्षणिक उपोषण.......!

कळवण तालुक्यात भाजपाचे श्रीक्षेत्र सप्तशृंगी देवी निवासीनी येथे पहिल्या पायरीवर लाक्षणिक उपोषण.......!

सप्तशृंगीगड : आज दि.13/10/20 रोजी भाजपाच्या वतीने गेल्या साडे सहा महिन्यापासून बंद असलेले मंदिरे, धार्मिक स्थळे, देवालये उघडावेत याकरिता सातत्याने मागणी करून देखील राज्यातील महाविकास आघाडी सरकारने कुठल्याही प्रकारची दखल किंवा निर्णय घेतला नाही. राज्यव्यापी घंटानाद आंदोलन केले तरीही राज्य शासनाने याबाबतीत ठोस निर्णय घेतला नाही.
       याउलट संतांची भुमी असलेल्या महाराष्ट्र राज्यात मदिरेचे बार सुरू केले परंतु मंदिरे बंद असे काळे चित्र उभे केले. यानिर्णयाविरोधात महाराष्ट्रातील विविध धर्माचार्य, साधुसंत,अनेक धार्मिक व आध्यात्मिक संघटना एकत्र येत आध्यात्मिक आघाडीच्या समन्वयातून राज्यव्यापी उपोषण करण्यात आले.

याचाच एक भाग म्हणून कळवण ता. भाजपाच्या वतीने श्री क्षेत्र सप्तशृंगी गड येथे पहिल्या पायरीवर मा.जिल्हाध्यक्ष विकास श देशमुख, तालुकाध्यक्ष दिपक खैरनार,  जेष्ठ नेते  सुधाकर पगार, गोविंद कोठावदे, निंबा पगार यांच्या नेतृत्वाखाली लाक्षणिक उपोषण करण्यात येवून नायब तहसीलदार श्री व्यंकटेश गुप्ते यांना निवेदन देण्यात आले.

या आंदोलनाप्रसगी तालुका महामंत्री डाॅ अनिल महाजन, सरचिटणीस  विश्वास पाटील,एस.के पगार , युवा मोर्चा अध्यक्ष हेमंत पगार, उपाध्यक्ष  हेमंत रावले ,विनायक दुबे शहराध्यक्ष प्रकाश कडवे, युवा मोर्चा कळवण  शहराध्यक्ष चेतन निकम,  लक्ष्मण कुलकर्णी, देव नाना अजय, राहुल बेनके,मनोहर कदम,माणिक सावंत, अमित दिक्षीत, आकाश बत्तासे,नंदू चित्ते ,प्रकाश मोरे, प्रविण कोतकर,दिनेश राजपूत, पुरोहित संघ,समाज बांधव, इ.बहुसंख्य पदाधिकारी व  कार्यकर्ते उपोषणनास उपस्थित होते.

कळवण

प्रतिनिधी - मनोहर गायकवाड

___________

Also see : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे जिल्ह्यातील मौजे कोंढणपूरच्या विश्वनाथ मुजुमले यांना ऑनलाईन मिळकत पत्रिका प्रदान

https://www.theganimikava.com/Prime-Minister-Narendra-Modi-hands-over-online-income-sheet-to-Vishwanath-Mujumle-of-Mauje-Kondanpur-in-Pune-district