हाथरस (उत्तरप्रदेश) सामूहिक बलात्कार प्रकरणी वाडा तहसील कार्यालय व पोलिस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले...

उत्तरप्रदेश येथील हाथरस जिल्ह्यातील चंदपा परिसरातील एका गावात १९ वर्षीय (मनिषा) या पिडीतेवर १४ सप्टेंबर रोजी सामूहिक बलात्कार करण्यात आला...

हाथरस (उत्तरप्रदेश) सामूहिक बलात्कार प्रकरणी वाडा तहसील कार्यालय व पोलिस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले...
A statement was issued at the Wada tehsil office and police station in the Hathras gang-rape case
हाथरस (उत्तरप्रदेश) सामूहिक बलात्कार प्रकरणी वाडा तहसील कार्यालय व पोलिस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले...
हाथरस (उत्तरप्रदेश) सामूहिक बलात्कार प्रकरणी वाडा तहसील कार्यालय व पोलिस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले...

हाथरस (उत्तरप्रदेश) सामूहिक बलात्कार प्रकरणी वाडा तहसील कार्यालय व पोलिस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले...
 
वाडा : उत्तरप्रदेश येथील हाथरस जिल्ह्यातील चंदपा परिसरातील एका गावात १९ वर्षीय (मनिषा) या पिडीतेवर १४ सप्टेंबर रोजी सामूहिक बलात्कार करण्यात आला. अमानुषपणे तिच्यावर अत्याचार करण्यात आले. तिची जीभ देखील कापण्यात आली. अखेर मृत्यूशी झुंजताना उपचारादरम्यान तिचे दुःखद निधन झाले. 

उत्तरप्रदेश मधील योगी सरकार या प्रकारावर मूग गिळून गप्प आहे. आरोपी अजूनही मोकाट आहेत. असे कृत्य करण्याच्या नराधमांना थेट फाशीची शिक्षा देण्यात यावी व अनुसूचित जाती जमाती तथा महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांवर सरकारने योग्य ती कारवाई करावी, या मागणीसाठी अ‍ॅड. अमोल राऊत, गवंडी बांधकाम मजूर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री.भिमराव बागुल, पालघर जिल्हाध्यक्ष सुजय जाधव, पेंटर कामगार संघटनेचे निरीक्षक श्री.रुपेश पाटील व खजिनदार शशिकांत गडगे यांच्या उपस्थित वाडा तहसील कार्यालय व वाडा पोलिस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले.

वाडा

प्रतिनिधी - जयेश घोडविंदे

________

Also see : लायन्स क्लब डिस्ट्रिक्ट ३२३४ डी २ तर्फे ४ ऑकटोबर रोजी रांगोळी आणि भित्तीपत्रक स्पर्धा

https://www.theganimikava.com/Rangoli-and-mural-competition-on-4th-October-by-Lions-Club-District-3234D2