हाथरस (उत्तरप्रदेश) सामूहिक बलात्कार प्रकरणी विक्रमगड तहसील कार्यालय व पोलिस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले...

उत्तरप्रदेश येथील हाथरस जिल्ह्यातील चंदपा परिसरातील एका गावात १९ वर्षीय (मनिषा) या पिडीतेवर १४ सप्टेंबर रोजी सामूहिक बलात्कार करण्यात आला.

हाथरस (उत्तरप्रदेश) सामूहिक बलात्कार प्रकरणी विक्रमगड तहसील कार्यालय व पोलिस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले...
A statement was issued at Vikramgad tehsil office and police station in the Hathras gang rape case

हाथरस (उत्तरप्रदेश) सामूहिक बलात्कार प्रकरणी विक्रमगड तहसील कार्यालय व पोलिस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले...

 विक्रमगड : उत्तरप्रदेश येथील हाथरस जिल्ह्यातील चंदपा परिसरातील एका गावात १९ वर्षीय (मनिषा) या पिडीतेवर १४ सप्टेंबर रोजी सामूहिक बलात्कार करण्यात आला. अमानुषपणे तिच्यावर अत्याचार करण्यात आले. तिची जीभ देखील कापण्यात आली. अखेर मृत्यूशी झुंजताना उपचारादरम्यान तिचे दुःखद निधन झाले. 

उत्तरप्रदेश मधील योगी सरकार या प्रकारावर मूग गिळून गप्प आहे. आरोपी अजूनही मोकाट आहेत. असे कृत्य करणाऱ्या नराधमांना थेट फाशीची शिक्षा देण्यात यावी व अनुसूचित जाती जमाती तथा महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांवर सरकारने योग्य ती कारवाई करावी, या मागणीसाठी भारतीय बौध्द महासभेचे तालुका अध्यक्ष आयु.राहुल दादासाहेब मोरे, महिला उपाध्यक्ष आयु.ईंदिरा नरेश दोंदे, सचिव महिला आयु.तेजश्री राहुल मोरे, उपाध्यक्ष संस्कार विभाग आयु.नंदाताई दादासाहेब मोरे, सचिव संस्कार विभाग आयु.यामिनीताई गायकवाड, कार्यालयीन सचिव आयु.जगदिश रघुनाथ धनगर, हिशोब तपासणीस आयु.अशोक गणपती निकम, पर्यटन व प्रचाार विभाग सचिव आयु.सौरभ नरेश दोंदे यांच्या उपस्थित विक्रमगड तहसील कार्यालय व विक्रमगड पोलिस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले.

 विक्रमगड

प्रतिनिधी-अजय लहारे 

__________

Also see : कोरोनाच्या विनाशाकरीता 'दगडूशेठ' गणपतीला सहस्त्रधारा अभिषेक व सहस्त्रदुर्वाचनातून साकडे

https://www.theganimikava.com/For-the-destruction-of-the-corona-Dagdusheth-Ganesha-was-anointed-with-Sahasradhara-Abhishek-and-Sahasradurvachana