सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावल्यास 500 रुपये दंड

कोविड 19 चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ.बिपीन शर्मा यांनी सार्वजनिक ठिकाणी विना मास्क फिरणाऱ्या विरुद्ध 500 रुपयांची दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला........

सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावल्यास 500 रुपये दंड
A fine of Rs 500 for not wearing a mask in a public place

सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावल्यास 500 रुपये दंड
                                      

ठाणे महापालिका आयुक्त डॉ.बिपीन शर्मा यांचे आदेश 

ठाणे (thane) : कोविड 19 चा (covid 19) वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका (muncipal corporation) आयुक्त डॉ.बिपीन शर्मा यांनी सार्वजनिक ठिकाणी विना मास्क फिरणाऱ्या विरुद्ध 500 रुपयांची दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला, असून प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त यांच्या नियंत्राखाली ही कारवाई करण्यात येणार आहे. ठाणे महानगरपालिका (thane muncipal corporation) हद्दीत व सार्वजनिक ठिकाणी शासकीय कार्यालये तसेच खासगी या ठिकाणी अनेक व्यक्ती विना मास्क संचार करतानाचे निर्दर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ. बिपीन शर्मा यांनी हा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावणाऱ्या व्यक्तींकडून 500रुपये दंड वसुल करण्यात येणार आहे. या कारवाई साठी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे स्वछता निरीक्षक उपमुख्य स्वछता निरीक्षक आरोग्य निरीक्षक अतिक्रमण व कर  विभागाचे बिट निरीक्षक बिट मुकादम त्याचप्रमाणे पाणी पुरवठा व सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. या कारवाई अंतर्गत विना मास्क पायी चालणाऱ्या व दुचाकीवरून जाणाऱ्या व्यक्तींकडून 500रुपये दंड वसूल करण्यात यावा असे आदेशात नमूद करण्यात आले, असून कारवाई करणे हा महापालिकेचा उद्देश नसून मास्कचा वापर बंधनकारक असल्याने नागरिकांनी कोरोना (corona) विरुद्धच्या लढाईमध्ये महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालीकेच्या वतीने करण्यात आले आहे.

ठाणे

प्रतिनिधी सत्यवान तरे

______

Also see : भाजपा शिक्षक आघाडीची कल्याण पूर्व कार्यकारणी जाहीर

https://www.theganimikava.com/BJP-teachers-alliances-welfare-executive-announced