महाराष्ट्र पत्रकार असोसिएशनच्या शिष्टमंडळाने घेतली दिवा येथील पीडितेची भेट कायदेशीर व कठोर कारवाई करण्याची मागणी
आज रोजी दिवा येथे अत्याचार झालेली रिक्षा चालक शीतल बनसोडे यांची कळवा ठाणे येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे महाराष्ट्र पत्रकार असोसियशनच्या टीम ने भेट घेतली.

महाराष्ट्र पत्रकार असोसिएशनच्या शिष्टमंडळाने घेतली दिवा येथील पीडितेची भेट कायदेशीर व कठोर कारवाई करण्याची मागणी
.
आज रोजी दिवा येथे अत्याचार झालेली रिक्षा चालक शीतल बनसोडे यांची कळवा ठाणे येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे महाराष्ट्र पत्रकार असोसियशन च्या टीम ने भेट घेतली. व सांत्वन केले तसेचत्यांच्यावर झालेल्या अत्याचारासंदर्भात मुख्यमंत्री गृहमंत्री पोलिस महासंचालक ठाणे जिल्ह्याचे पोलीस आयुक्त यांची भेट घेऊन संबंधित सर्व आरोपी वर कायदेशीर कारवाई करण्यात यावी तसेच पीडित व त्याच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण देण्यात यावेतसेच त्यांना संरक्षण देणारे समाजसेवक अमोल केंद्रे यांना सुद्धा संरक्षण देण्यात यावे याची मागणी करणार आहोत. यावेळी संस्थापक अध्यक्ष संजय बोर्डे महासचिव सिद्धार्थदादा काळे संघटक भास्करराव खरात ज्येष्ठ सल्लागार पत्रकार तानाजी कांबळे व सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष बाळकृष्ण कांबळे हे उपस्थित होते.
मुंबई
प्रतिनिधी - संजय बोर्डे
________
Also see : दूषित पाण्यामुळे भातशेतीच नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे आदेश