१७ वर्षीय तरुणाचा सुर्या नदीत बुडून मृत्यू
१७ वर्षीय तरुणांचा स्टंटबाजी करताना सुर्या नदीत बुडून मृत्यू

१७ वर्षीय तरुणांचा स्टंटबाजी करताना सुर्या नदीत बुडून मृत्यू
बोईसर येथील १७ वर्षीय तरुणांचा नदीपात्रात बुडून मृत्यू, बोईसर औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पूर्वेकडे लालोंडे फुलांचापाडा तर पश्चिमेला गुंदले गाव असून या गावांच्या मधून सूर्या नदी वाहत आहे. याच नदीवर नवीन आणि जुने अशी दोन पूल आहेत. या ठिकाणाहून बोईसर औद्योगिक वसाहतीला पाणी पुरवठा होतो. पाणी पुरवठ्यासाठी बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यावर एक तरुण स्टंटबाजी करताना सूर्या नदीत बुडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
बोईसर मान येथील ओस्तवाल वंडर सिटीमध्ये राहणार संजीत कनोजिया हा १७ वर्षीय युवक आपल्या दोन मित्रांसोबत गुंदले येथिल सूर्या नदीपत्रात पोहण्यासाठी आला असता पोहण्याची पध्दत आणि स्टंट त्याच्या जीवावर बेतले आहे. संजीत आपल्या दोन मित्रांसोबत नदीत पोहत असताना बंधाऱ्यावरून स्टंटबाजी करत पाण्यात उड्या मारत होते. याच दरम्यान दोघा मित्रांचा तोल जाऊन ते बंधाऱ्याच्या खालील बाजूस पडले असता पाणी खोल असल्याने ते बुडू लागले. हे त्यांच्या तिसऱ्या मित्राच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केल्याने तेथे असलेल्या स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन ऐका तरुणाला बुडण्यापासून वाचविले. परंतु संजीव कनोजिया याला वाचविण्यास त्यांना अपयश आले असल्याने त्याचा नदीपात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
पोलीस घटनास्थळी पोहचले असून मृतदेह शोधण्याचे काम सुरू आहे. याच ठिकाणी जुलै महिन्यात ही बोईसर येथील एक तरुण पोहण्यासाठी उतरला असता त्याचा बुडून मृत्यू झाला होता. त्यामुळे हे ठिकाण धोकादायक होत चालले आहे. म्हणून या ठिकाणी येणाऱ्यांना मनाई करण्यात यावी अशी स्थानिकांची मागणी आहे.
पालघर
प्रतिनिधी - राजेंद्र पाटील
______
Also see :पालघर जिल्ह्यामधुन व्रूक्षारोपण कार्यक्रम संपन्न..
https://www.theganimikava.com/a-tree-planting-program-was-held-in-Palghar-district-by-sambhhaji-brigade-state-president