कल्याण डोंबिवलीत ५७२ नवे रुग्ण तर ६ जणांचा मृत्यू

३७,२४० एकूण रुग्ण तर ७५० जणांचा आतापर्यंत मृत्यू तर २४ तासांत ४८५ रुग्णांना डिस्चार्ज....

कल्याण डोंबिवलीत ५७२ नवे रुग्ण तर ६ जणांचा मृत्यू
572 new patients and 6 deaths in Kalyan Dombivali

कल्याण डोंबिवलीत ५७२ नवे रुग्ण तर ६ जणांचा मृत्यू

३७,२४० एकूण रुग्ण तर ७५० जणांचा आतापर्यंत मृत्यू

तर २४ तासांत ४८५ रुग्णांना डिस्चार्ज

कल्याण (kalyan) : कल्याण डोंबिवली महानगरपालिका (muncipal corporation) क्षेत्रात आज नव्या ५७२ कोरोना (corona) रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ६ जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ४८५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आजच्या या ५७२ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ३७,२४० झाली आहे. यामध्ये ५३१८ रुग्ण उपचार घेत असून ३१,१७२  रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ७५० जणांचा कोरोनामुळे (corona) मृत्यू झाला आहे. आजच्या ५७२ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व ७२,  कल्याण प.- १६६, डोंबिवली पूर्व १७१, डोंबिवली प- ८५, मांडा टिटवाळा –५२,, मोहना – १८, तर पिसवली येथील ८ रुग्णांचा समावेश आहे. 

 डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी १२१ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून, १४ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडा संकुलमधून, ३ रुग्ण बाज आर. आर. रुग्णालय,  २ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून (covid care center), ७ रुग्ण शास्त्री नगर रुग्णालयातून तर जिमखाना कोविड सेंटर (covid centre) येथून १ रुग्ण  डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

कल्याण, ठाणे
प्रतिनिधी - कुणाल म्हात्रे

_______

Also see : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे केंद्र सरकार विरोधात आंदोलन

https://www.theganimikava.com/Movement-of-the-Marxist-Communist-Party-against-the-Central-Government